Mosambi Farming : अशास्त्रीय पाणीवापर मोसंबीसाठी घातक : डॉ. पाटील

काही ठिकाणी मोसंबी फळपिकासाठी करण्यात येणाऱ्या चुकीच्या पाणीपध्दतीचा वापर उत्पादकतेस हानिकारक ठरत आहे, असे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख कृषी शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.
Mosambi Farming
Mosambi FarmingAgrowon

पैठण, जि. औरंगाबाद : काही ठिकाणी मोसंबी फळपिकासाठी (Mosambi Crop) करण्यात येणाऱ्या चुकीच्या पाणीपध्दतीचा (Use Of Water) वापर उत्पादकतेस हानिकारक ठरत आहे, असे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख कृषी शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.

Mosambi Farming
Mosambi Orchard : मोसंबीतून आर्थिक स्थैर्य शक्य

मोसंबी संशोधन केंद्र, पाचोड (ता. पैठण) येथे आयोजित किसान दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर झुआरीचे मुख्य व्यवस्थापक राजेंद्र डावकर, जिल्हा विपणन अधिकारी गणेश पाबळे, मोसंबी उत्पादक भाऊसाहेब नलावडे, सुभाष चौरे, अप्पासाहेब नलावडे आदींची उपस्थिती होती.

Mosambi Farming
Mosambi : पाणीताण तोडणीसाठी आंबवणी फायदेशीर ः डॉ. संजय पाटील

या वेळी डॉ. पाटील म्हणाले, ‘‘मोसंबी पीक अति पाण्याला संवेदनशील आहे. त्यामुळे जमीन नेहमी वापसा स्थितीत ठेवावी, मराठवाड्यातील हलक्या अन् चुनखडीयुक्त जमिनीत लागवड करण्यात आलेल्या मोसंबी बागांत सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसत आहे.

यासाठी फवारणीतून पुरवठा करणे फायदेशीर ठरते .मोसंबी पिकास संतुलित प्रमाणात रासायनिक, सेंद्रिय अन् जैविक घटकांचा वापर जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतो. कार्यक्रमासाठी एकनाथ लेंभे, अरुण कळमकर,अप्पा केडे, रामराव ढाकणे आदी मोसंबी बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक राजेंद्र डावकर, तर आभार प्रदर्शन नामदेव सपकाळ यांनी मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com