Devendra Fadnavis
Devendra Fadnavisagrowon

Unseasonal Rain Damage Compensation : अवकाळीची नुकसान भरपाई ८-९ दिवसात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात : फडणवीस

Devendra Fadnavis : अवकाळी आणि गारपिठीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर थेट मंत्रालयातूनच ८-९ दिवसात मदतीचे वितरण केले जाणार आहे.

Devendra Fadnavis in Ahmednagar : राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीठमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या उद्देशाने थेट मंत्रालयातून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान देण्यात येत आहे. मागील आठवड्यामध्ये झालेल्या नुकसानीसाठी पैसे उपलब्ध झाले असून पुढील ८-९ दिवसात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Devendra Fadnavis
Jalyukt Shiwar 2.0 : 'जलयुक्त'च्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना आजपासून सुरूवात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातील कामांचा आढावा बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार राम शिंदे, बबनराव पाचपुते, खा. सुजय विखे-पाटील उपस्थित होते

यावेळी फडणवीस यांनी पावसाळा जवळ आल्यामुळे जलयुक्त शिवार अभियान २.० ची कामे गतीने करा. त्याचबरोबर गाळमुक्त शिवार, गाळयुक्त शिवार योजना प्रभावी राबविण्यााच्या सुचना प्रशासनाला दिल्या.

Devendra Fadnavis
Kharif Season : शेतकऱ्यांनो... इतक्यात पेरणीची घाई नको ; खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत आवाहन

फडणवीस म्हणाले, नैसर्गिक आपत्तीतील नुकसानग्रस्तांना मदतीचे वितरण करताना पूर्वी जिल्हास्तरावरून तालुक्यांना निधी पाठवला जात होता. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या पंचनाम्यानुसार त्यांच्या बँकखात्यात मदत जमा केली जात होती. पण आता शासनाने नवीन पद्धत अवलंबली आहे. त्यामध्ये आपत्तीनंतर पिकांचे पंचनामे करून निधी मागणी अहवाल संबंधित यंत्रणेमार्फत शासनाला पाठवण्यात येईल. त्यानंतर शासन निर्णय जाहीर होऊन तो ऑनलाइन निधी वितरण प्रणालीत समाविष्ट केला जाईल.

मागच्या काळात २०२२ चे अनुदान उपलब्ध झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यासाठी २९१ कोटी अनुदान दिले आहे. त्यापैकी १ लाख ३५ शेतकऱ्यांना वाटप १६१ कोटींचा अनुदान वाटप करण्यात आले आहे. उर्वरित १ लाख शेतकऱ्यांचे अनुदान ८-९ दिवसात खात्यात जमा होईल. त्यासाठी संबंधित तहसील कार्यालयाकडून भरपाईच्या अनुदानास पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी विहित नमुन्यात नुकसानग्रस्ताचा आधार क्रमांक, बँक खाते, आयएफसी कोड, मोबाईल क्रमांक आदी माहिती भरून अपलोड केली जाईल. त्या वेळी लाभार्थ्याचे बँकखाते आधारशी लिंक आहे का, याचीही खात्री केली जाईल. नुकसानग्रस्तांची माहिती अपलोड झाल्यानंतर शासन त्यांच्या बॅंकखात्यात थेट मंत्रालयातून रक्कम जमा करण्याची कार्यवाही करेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com