Nanded Crop Damage News : नांदेड जिल्ह्यात ‘अवकाळी’चे थैमान सुरूच

Unseasonal Rain : जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने कहर केला आहे. या अवकाळी पावसामुळे बागायती पिकांसह उन्हाळी ज्वारी भाजीपाला फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Crops leveled by unseasonal rains
Crops leveled by unseasonal rains

Crop Damage Update : जिल्ह्यात अनेक मंडलांत गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात सोमवारी (ता.१) दुपारी झालेल्या पावसाने बिलोली तालुक्यातील सगरोळी महसूल मंडलात तब्बल ८१ मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी अतिवृष्टीची (Heavy Rain) नोंद झाली आहे.

Crops leveled by unseasonal rains
Crop Damage : आंबे गळाले; हळद भिजली, बाजरी-मका आडवी

जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने कहर केला आहे. या अवकाळी पावसामुळे बागायती पिकांसह उन्हाळी ज्वारी भाजीपाला फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Crops leveled by unseasonal rains
Crop Damage : कळंबीत ६०० एकरावरील पिके करपली

जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे आदेश क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिले आहेत. यामुळे अंतिम आकडेवारी एक-दोन दिवसांत मिळेल, अशी माहिती महसूल प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. शासकीय ध्वजवंदनासाठी आलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला. पंचनामे होत असल्याचे सांगितले.

दरम्यान, रविवारी (ता. ३०) झालेल्या जोरदार पावसानंतर सोमवारीही (ता. १) जिल्ह्यात पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू होता. हा पाऊस बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे तालुक्यातील सगरोळी महसूल मंडळात तब्बल ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यासोबतच आदमपूर मंडळामध्ये २८, रामतीर्थ मंडळात २४, करखेली मंडळात २९.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com