Sindhudurg Rain : सिंधुदुर्गला अवकाळी पावसाचा तडाखा

विजांचा कडकडाट आणि वादळीवाऱ्यांसह सोमवारी (ता. २८) सायकांळी अवकाळीचा तडाखा जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला बसला.
Rain Update
Rain UpdateAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः विजांचा कडकडाट (Lightning) आणि वादळीवाऱ्यांसह सोमवारी (ता. २८) सायकांळी अवकाळीचा तडाखा (Untimely Rain) जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला बसला. कणकवलीला तर अवकाळीने अक्षरशः झोडपून काढले. पावसामुळे यावर्षीच्या आंबा, काजू हंगामावर (Cashew Season) पाणी पडण्याची चिन्हे निर्माण झाल्यामुळे आंबा, काजू बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Rain Update
Mango Cashew : सिंधुदुर्गात आंबा, काजूला पालवी फुटण्यास सुरुवात

अवकाळी पावसाने रविवारी (ता. २७) सायकांळी वैभववाडीला झोडपले होते. तत्पूर्वी पहाटे वेंगुर्ला, कुडाळ तालुक्यात अवकाळीच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या. सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यात उकाड्याचे प्रमाण देखील वाढले होते. त्यामुळे पाऊस पडेल असा अंदाज होता. दरम्यान दुपारी तीन वाजल्यानंतर पावसाचे वातावरण तयार झाले.

साडेतीन चार वाजेपासून कणकवली विजांच्या गडगडाटाला सुरुवात झाली. त्यापाठोपाठ जोरदार पावसाला सुरुवात देखील झाली. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी या तालुक्यांच्या सर्वच भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मालवण तालुक्यात देखील पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या भागात देखील विजा चमकत होत्या. विजांच्या गडगडाटासोबत वाऱ्याचा वेग देखील वाढला होता. कणकवली तालुक्यात सर्वाधीक पाऊस झाला. कणकवली शहरात ४५ मिनिटे पाऊस सुरू होता. वैभववाडी तालुक्यात देखील दमदार पाऊस झाला.

Rain Update
Mango crop Advisory : मोहोर अवस्थेतील आंबा बागेचे व्यवस्थापन

दरम्यान अवकाळी पावसामुळे आंबा, काजूच्या हंगामापुढेच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गेले तीन चार दिवस जिल्ह्याच्या काही भागात सतत अवकाळी पाऊस पडत आहे. याशिवाय दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे अवकाळीचे अस्मानी संकटाची चाहुल आंबा, काजू बागायतदारांना लागली आहे. त्यामुळे आंबा, काजू बागायतदार कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. सध्याच्या वातावरणामुळे आंबा काजूवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

पालवी, मोहोर संरक्षणासाठी कसरत

आंबा, काजूला काही ठिकाणी पालवी तर काही ठिकाणी मोहोर येण्याची प्रकिया सुरू आहे. अनेक बागायतदारांनी यापूर्वीच एक-एक फवारणी केली आहे. परंतु अवकाळी पाऊस आणि सतत असलेले ढगाळ वातावरण यामुळे आंबा, काजूवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. झाडांना आलेली पालवी आणि मोहोर टिकविण्यासाठी मोठी कसरत बागायतदारांना करावी लागणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com