
जळगाव : केंद्र शासनाकडील १९ सप्टेंबर २०२२ च्या अधिसूचनेनुसार, ज्या व्यक्तींना आधार कार्ड (Aadhar Card) काढून १० वर्षे पूर्ण झाली असतील त्यांनी आपले आधार कार्ड अद्ययावत (Aadhar Update) करणे गरजेचे असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिली.
केंद्र व राज्य शासनाच्या अनेक सेवांचा लाभ घेण्यासाठी आता आधारचा वापर केला जात आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी नवीनतम आणि अद्ययावत तपशिलासह आधार सादर करणे आवश्यक आहे. ज्यांना आधार कार्ड काढून १० वर्षांहून अधिक काळ झालेला आहे.
परंतु अद्ययावत केले नसतील, उदाहरणार्थ पत्ता, मोबाईल क्रमांक किंवा त्यांच्या लोकसंख्येच्या तपशीलात कोणताही बदल झालेला नाही, अशा रहिवाशांना आधार देणारी कागदपत्रे अपलोड करून त्यांचा पत्ता पुन्हा सत्यप्रत करणे आवश्यक आहे. त्यानुसार ‘आधार’धारकांना या संदर्भात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘डॉक्युमेंट अपडेट’ हे नवीन फीचर विकसित करण्यात आले आहे. नागरिक कोणत्याही आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन आधार अद्ययावत करू शकतात.
जसे आपले सरकार सेवा केंद्र, सेंट्रल बँक, सीएससी सेंटर, बीएसएनएल कार्यालय या ठिकाणी अद्ययावत करू शकतील. महिला व बालविकास विभागांतर्गत ० ते ५ वयोगटातील बालकांची आधार नोंदणी अंगणवाडीमध्ये करण्यात येत आहे. ही नोंदणी निःशुल्क आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे कायमस्वरूपी एक आधार संच बसविण्यात आला आहे. त्या ठिकाणी नागरिकांना आधार कार्ड अद्ययावत करता येतील. आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी शासनाकडील निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार शुल्क आकारले जाईल. या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी मित्तल यांनी सांगितले. अधिक माहितीकरिता १९४७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.