ऊर्ध्व गोदावरीला मिळणार प्रशासकीय मान्यता

आमदार छगन भुजबळ यांनी अधिवेशनात ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पामधील मांजरपाडा, वळण योजनेसह कालव्यांच्या अपूर्ण कामांच्या पूर्णत्वासाठी ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प अहवालास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्याची मागणी केली.
Godavari
GodavariAgrowon

नाशिक : आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अधिवेशनात ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पामधील (Upper Godavari Project) मांजरपाडा, वळण योजनेसह कालव्यांच्या (Godavari Canal Work) अपूर्ण कामांच्या पूर्णत्वासाठी ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प अहवालास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्याची मागणी केली. त्यावर प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे आश्‍वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले.

Godavari
Soybean : अमेरिकेत सोयाबीन दर स्थिरावले

प्रकल्पाचा प्रस्ताव मार्च २०२१ ला राज्यस्तरीय तांत्रिक मान्यता समितीकडून सादर झाला. त्याची सर्व प्रक्रिया पूर्णत्वास असताना सुधारित प्रशासकीय मान्यतेचा विषय प्रलंबित आहे. सुधारित मान्यतेशिवाय जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गतची दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा (देवसाने), धोंडाळपाडा, ननाशी, गोळशी, महाजे यांसह पश्‍चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविणाऱ्या सर्व प्रवाही वळण कालवा योजनांची अर्धवट कामे पूर्ण होऊ शकत नाहीत. पुणेगाव-दरसवाडी, दरसवाडी-डोंगरगाव विस्तारीकरण व काँक्रिटीकरण आणि ओझरखेड डावा कालव्याची अपूर्ण कामे मार्गी लागण्यासाठी सुधारित मान्यता गरजेची आहे. या विषयाला लवकरात लवकर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात यावी आणि या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी मागणी भुजबळ यांनी केली.

Godavari
Cotton : कपाशीवर घोंगावतेय गुलाबी बोंड अळीचे संकट

दमणगंगा आणि पार खोऱ्यात महाराष्ट्राच्या पाणलोट क्षेत्रामध्ये केंद्रीय जल आयोगानुसार अनुक्रमे ५५ व २९ टीएमसी, असे एकूण ८४ टीएमसी उपलब्ध पाणी पश्‍चिम वाहिनी दमणगंगा-नार-पार, औरंगा व अंबिका या नद्यांचे राज्यातील पाणलोट क्षेत्रातील पाणी पश्‍चिमेकडे समुद्राला व गुजरातमध्ये वाहून जात आहे. दमणगंगा व नार-पार खोऱ्यातील पाणी पूर्वेकडे दुष्काळी मराठवाड्यासह नाशिकच्या भागात वळविण्यासाठी राज्य महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवावा, अशी मागणी भुजबळ यांनी केली.

गोदावरी खोऱ्यातील मराठवाडा व नाशिक जिल्ह्यांतील काही तालुके तसेच गिरणा उपखोऱ्यातील तालुके प्रचंड दुष्काळाचा सामना करत आहेत. या भागातील दुष्काळावर मार्ग काढण्यासाठी पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोरे आणि गिरणा उपखोऱ्यात वळविण्याशिवाय पर्याय नाही. असे सांगतानाच भुजबळ यांनी दमणगंगा व नार-पार खोऱ्यातील पाणी पूर्वेकडे दुष्काळग्रस्त मराठवाड्यासह नाशिकच्या पूर्व भागात वळविण्यासाठी राज्यांतर्गत महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविणे आवश्यक असल्याचे सभागृहात सांगितले. तेलंगणा शासनाने मागील काळात कालेश्वरम ही देशासाठी पथदर्शी अशी योजना ज्या पद्धतीने राबविली त्याच पद्धतीने राज्याचे हित आणि सिंचनाचे महत्त्व लक्षात घेऊन हे जलसंपदा प्रकल्प शीघ्र गतीने मार्गी लावणे गरजेचे आहे, असे मत या वेळी सभागृहात मांडले.

तापीचे हक्काचे पाणीही घेऊ

तापी खोऱ्यामधील महाराष्ट्राच्या हक्काच्या १९१ टीएमसी पाण्यापैकी सुमारे १०० टीएमसी पाणी गुजरातमधील उकई धरणात वाहून जाते. निधीअभावी अजूनपर्यंत आपण हे पाणी अडवू शकलो नाही. फडणवीस यांनी राज्याचा जल आराखडा तयार झाला आहे, त्याचप्रमाणे या विविध योजनांचे सविस्तर अहवाल अंतिम टप्प्यात आहेत. यामुळे हे प्रकल्प फास्टट्रॅकच्या माध्यमातून राबविले जातील, असे आश्‍वासन दिले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com