Upper Painganga Water Project : ‘ऊर्ध्व पैनगंगा’त सात बंधाऱ्यांचा समावेश

पैनगंगा नदीवर सात उच्चपातळीचे बंधारे मंजूर करण्यात यावेत, यासाठी खासदार पाटील हे मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होते.
MP Hemant Patil
MP Hemant PatilAgrowon

Panganga Water Project Nanded : नांदेडसह यवतमाळ जिल्ह्यातील गावांना पिण्याचे पाणी, सिंचनासाठी (Agriculture Irrigation) लाभदायक ठरणाऱ्या पैनगंगा नदीवरील सात उच्चपातळी बंधाऱ्यांचा ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात (Painganga Water Project) समावेश करण्यात आला आहे.

खासदार हेमंत पाटील यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. यामध्ये किनवट, माहूर, हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील गावांचा समावेश आहे. या सात उच्चपातळी बंधाऱ्यांना मान्यता मिळाल्यामुळे मराठवाडा, विदर्भातील शेतकरी, जनतेत समाधान आहे.

पैनगंगा नदीवर सात उच्चपातळीचे बंधारे मंजूर करण्यात यावेत, यासाठी खासदार पाटील हे मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होते. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली.

MP Hemant Patil
Water Conservation : लोकसहभागातून जलसंधारणामुळे घाटसिरस झाले पाणीदार

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या सात बंधाऱ्यांना तत्काळ मंजुरी देऊन एक महिन्यात राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून मान्यता देण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यावर अवघ्या २० दिवसांत कार्यवाही करत जलसंपदा विभागाने यास मान्यता दिली आहे.

MP Hemant Patil
Painganga River : पैनगंगा नदीवरील उच्चपातळी सात बंधाऱ्यांना तत्त्वतः मंजुरी

नांदेड, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांसाठी वरदान ठरणाऱ्या या प्रकल्पामुळे नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर, किनवट आणि माहूर हे तालुके सुजलाम सुफलाम होणार आहेत. सोबतच हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, या भागासह विदर्भातील पुसद, उमरखेड, महागाव या तालुक्यांना सुद्धा लाभ होणार आहे.

MP Hemant Patil
Water Shortage : यंदा नाशिक जिल्ह्याचा टंचाई आराखडा २ कोटींनी कमी

यामध्ये हदगाव तालुक्यातील पांगरा, बनचिंचोली, गोजेगाव, हिमायतनगर तालुक्यातील घारापूर, किनवट तालुक्यातील किनवट आणि मारेगाव तर माहूर तालुक्यातील धनोडा या सात गावांचा समावेश आहे.

लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाला अंदाजित एक हजार सहाशे कोटी रुपये खर्च होणार असून प्रती वर्षी पाचशे कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

सिंचनाबाबत मराठवाडा मागासलेला आहे. त्याचा परिणाम शेती व उद्योग व्यापारावर होताना दिसून येतो. पाण्याअभावी अनेक मोठे प्रकल्प इतरत्र हलविण्यात आले आहेत. सिंचनाचा प्रश्न मार्गी लागल्यास मराठवाड्यातील समस्या सुटतील. मतदारसंघात पाणी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन अनेक नवनवीन प्रकल्प हाती घेऊन विकासाला गती दिली आहे.
हेमंत पाटील, खासदार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com