Ramesh Bais : शिक्षणाचा उपयोग कृषी विकासासह देश समृद्धीसाठी करा ः राज्यपाल बैस

शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरीसाठी न करता युवकांनी राज्य व देशाच्या समृद्धीसाठी ज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
Ramesh Bais
Ramesh BaisAgrowon

Ratnagiri News : शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरीसाठी न करता युवकांनी राज्य व देशाच्या समृद्धीसाठी ज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या (BSKKV Dapoli) पदवीदान समारंभात (Convocation Ceremony) ते बोलत होते. विद्यापीठाचा ४१ वा पदवीदान समारंभ दापोली येथील विद्यापीठाच्या डॉ. विश्वेश्वरय्या सभागृहात पार पडला.

या कार्यक्रमास कृषिमंत्री अब्दुल सत्तार, केंद्रीय कृषी विश्वविद्यालय इंफाळ येथील कुलपती व भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक पद्मश्री डॉ. एस. अय्यपन, उद्योगमंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, आमदार योगेश कदम, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भरत साळवी आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

कोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, कोकण विभागाचे पोलिस महासंचालक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रांताधिकारी शरद पवार आदींची ही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

Ramesh Bais
Agriculture Education : ग्राममंगल मुक्तशाळेतून मिळतेय कृषीचे शिक्षण

राज्यपाल बैस म्हणाले की, देशात शहरीकरणाचा जोर वाढत आहे अशा पार्श्वभूमीवर शेतीला अधिक महत्त्व प्राप्त होणार असून येणाऱ्या काळात इतर धनसंपत्तीपेक्षा ज्याच्याकडे शेती आहे असे शेतकरी संपन्न व्यक्ती म्हणून ओळखले जातील. भावी पिढ्यांसाठी शेतीमधील गुंतवणूक आणि त्यातील उत्पादन यांचे महत्त्व अनन्यसाधारण राहणार आहे, असे राज्यपाल यांनी सांगितले.

Ramesh Bais
Agriculture Education : कृषी शिक्षणात भू-सूक्ष्म जीवशास्त्रावर द्या भर

या समारंभात राज्यपालांच्या हस्ते ३४ पीएचडी, १०५ पदव्युत्तर पदवी आणि २१०५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

याच कार्यक्रमात वर्ष २०२०-२१ आणि २१-२२ अंतर्गत सुवर्णपदक विजेत्यांचाही गौरव करण्यात आला. या व्यतिरिक्त इतर क्षेत्रातील सुवर्णपदक विजेत्यांना पदकासह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Ramesh Bais
Agriculture News : आर्थिकदृष्ट्या झेपेल तोच उद्योग उभारावा

या प्रसंगी डॉ. एस. अय्यपन म्हणाले, जागतिकस्तरावर कृषी उत्पादनात भारत अग्रेसर ठरलेला आहे. यापुढील काळात तज्ज्ञ व शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या माध्यमातून यात भर घालण्याची गरज आहे.

तसेच कृषिमंत्री सत्तार यांनी आगामी काळात कृषी विद्यापीठांमधील सर्व सर्व रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे राज्यपालांनी विधानसभेतील अभिभाषणात सांगितले होते.

त्याची पूर्तता कृषी विभाग करेल आणि कृषी विभागांतर्गत सर्व पदे भरली जातील याची काळजी शासन घेत आहे, असे सांगितले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी प्रास्ताविकात आजवर झालेल्या विद्यापीठातील संशोधनांची माहिती दिली. तसेच विद्यापीठ राबवीत असलेले विविध उपक्रम आणि संशोधने या बाबत माहिती दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com