Farmer Income : कमी खर्च, मूल्यवर्धन, विपणन या त्रिसूत्रीचा दुप्पट उत्पन्नासाठी वापर करा

अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी संत्रा शेती शाश्वत टिकवून राहण्याकरिता शेतक-यांनी मूल्यवर्धन, बाजारपेठ व्यवस्थापन व निर्यात बळकट करण्याकरिता नियोजन आराखडा तयार करावा व संत्रा पिकाला समृद्धी आणावी असे आवाहन केले.
Farmer Income : कमी खर्च, मूल्यवर्धन, विपणन या त्रिसूत्रीचा दुप्पट उत्पन्नासाठी वापर करा

वाशीम ः ‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट (Doubling Farmer Income) करण्यासाठी उत्पादन दुप्पट (Agriculture Production) करणे, उत्पादन खर्च (Production Cost) ५० टक्के कमी करणे व ग्रेडिंग पॅकिंग आणि विपणन या त्रिसूत्रीचा अवलंब करावा,’’ असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे (PDKV) कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

वाशीम जिल्ह्यातील वडजी येथे संत्रा फळबाग प्रयोग व प्रयत्नांची शास्त्रीय माहिती प्रात्यक्षिक स्वरूपात मांडून संत्रा उत्पादकांमध्ये नवचैतन्य निर्माण होण्याच्या दृष्टीने कृषी विज्ञान केंद्र, धानुका व संत्रा उत्पादक शेतकरी, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कार्यशाळा व शिवार फेरी रविवारी (ता.१५) गोपाल बोरकर यांच्या संत्रा बागेत आयोजित करण्यात आली होती.

Farmer Income : कमी खर्च, मूल्यवर्धन, विपणन या त्रिसूत्रीचा दुप्पट उत्पन्नासाठी वापर करा
Farmer Income : पीक विमा योजनेत बदल करण्यास सरकार तयार : आहुजा

यावेळी कुलगुरू डॉ. गडाख हे उद्घाटक म्हणून बोलत होते. कुलगुरू डॉ. गडाख यांनी कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानामध्ये कृषी विज्ञान केंद्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून संत्रा पिकातील केव्हीकेच्या मार्गदर्शनात वडजी येथील संत्रा उत्पादकांच्या बागा व फळांची प्रत उत्कृष्ट असून हेक्टरी ४० टनांपर्यंत उत्पादन घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुविदे फाउंडेशन, कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष माजी खासदार अनंतराव देशमुख होते. तर उद्घाटक म्हणून कुलगुरू गडाख होते. गट शेतीप्रणेते डॉ.भगवान कापसे, सुविदे फाउंडेशनचे विश्वस्त चैतन्य देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व संजय उखळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Farmer Income : कमी खर्च, मूल्यवर्धन, विपणन या त्रिसूत्रीचा दुप्पट उत्पन्नासाठी वापर करा
Farmer Doubling Income : शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाचं काय झालं?

प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाचे फळशास्त्र विभाग प्रमुख डॉ.शशांक भराड, डॉ.योगेश इंगळे, प्रभारी अधिकारी डॉ.उज्ज्वल राऊत, धानुकाचे सूरज देशमुख, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.आर.एल.काळे, सरपंच शत्रुघ्न बाजड, उपसरपंच अकातराव बोरकर, पोलिस पाटील प्रदीप बोरकर, प्रयोगशील शेतकरी हेमंत देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी संत्रा शेती शाश्वत टिकवून राहण्याकरिता शेतक-यांनी मूल्यवर्धन, बाजारपेठ व्यवस्थापन व निर्यात बळकट करण्याकरिता नियोजन आराखडा तयार करावा व संत्रा पिकाला समृद्धी आणावी असे आवाहन केले. डॉ. कापसे यांनी तंत्रज्ञानाचा वापर, एकत्रित शेती, बाजारपेठ सर्वेक्षण तसेच कृषी समृद्धी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन केले.

डॉ. आर. एल. काळे यांनी केव्हीकेच्या उपक्रमांची माहिती दिली. केव्हीकेचे फलोत्पादन तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी संत्रा फळपिकाची माहिती दिली. डॉ. भराड, डॉ. इंगळे, डॉ. राऊत, सूरज देशमुख व निवृत्ती पाटील यांनी उत्तरे दिली. संत्रा उत्पादक शेतकरी गोपाल बोरकर व राजेश बोरकर यांनी शेती पद्धती व संत्रा पिकाची माहिती दिली. केव्हीकेच्या मार्गदर्शनात ४०० एकर क्षेत्रावर संत्रा लागवड झाली असून पैकी ११ शेतकऱ्यांचे ३६ एकरातील चार वर्षांच्या बागेपासून दीडकोटी मिळत असल्याची माहिती दिली.

वाशीम ऑरेंजचे उद्घाटन

जिल्हास्तरीय कार्यशाळेत मान्यवरांच्या हस्ते वाशीम जिल्हा संत्रा उत्पादक व नवचैतन्य कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या वाशीम ऑरेंज (WAO) नावाच्या ब्रँडचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com