मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ३४ टक्क्यांवर

अलीकडच्या तीन-चार दिवसात मराठवाड्यातील काही भागात पावसाची हजेरी लागणे सुरू झाले आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील ८७५ प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ३४ टक्क्यांवर आला आहे.
मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ३४ टक्क्यांवर
DamAgrowon
Published on

अलीकडच्या तीन-चार दिवसात मराठवाड्यातील काही भागात पावसाची हजेरी लागणे सुरू झाले आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील ८७५ प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ३४ टक्क्यांवर आला आहे.

यामध्ये मोठ्या ११ प्रकल्पात ४० टक्के, ७५ मध्यम प्रकल्पात २५ टक्के, ७४९ लघु प्रकल्पात केवळ १७ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात ३४ टक्के तर तेरणा,मांजरा व रेना नदीवरील २५ बंधाऱ्यात असलेल्या ६९ टक्के उपयुक्त पाणीसाठा याचा समावेश आहे.

२०५ लघु प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.

मध्यम प्रकल्पांचीही स्थिती फारशी समाधानकारक नाही. औरंगाबादमधील १६, उस्मानाबादमधील १७ मध्यम प्रकल्पात प्रत्येकी २६ टक्के, जालन्यातील ७ मध्‍यम प्रकल्‍पात २५ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पात २७ टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पात, २५ टक्के, नांदेडमधील ९ प्रकल्पात २३ टक्के तर परभणीतील २ मध्यम प्रकल्पात केवळ १८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या लघु प्रकल्पांमध्ये औरंगाबादमधील २७, जालनामधील २८, बीडमधील ६२, लातूर व उस्मानाबादमधील प्रत्येकी २७, नांदेडमधील २४ व परभणीतील १० लघु प्रकल्पांचा समावेश आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com