Cotton Processing
Cotton Processing Agrowon

Cotton Processing : प्रक्रियेतून कापसाचे मूल्यवर्धन

अति सघन पद्धतीने लागवड आणि उत्पादित कापसावर प्रक्रिया केल्यास शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळतो.

Nagpur News ‘‘अति सघन पद्धतीने लागवड आणि उत्पादित कापसावर प्रक्रिया (Cotton Processing) केल्यास शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी अशा पर्यायाचा अवलंब करावा,’’ असे आवाहन स्मार्ट कॉटनमधील तज्ज्ञ मार्गदर्शक प्रदीप उमरकर यांनी केले.

‘ॲग्रोवन’च्या वतीने नरखेड तालुक्यातील मसोरा येथील समाज मंदिरात आयोजित ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतीक कांबळे होते. उमरकर पुढे म्हणाले, ‘‘सातत्याने एकच पीक घेत असल्याने कापसाची उत्पादकता कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या पिकातून चांगला परतावा मिळत नाही.

Cotton Processing
Tur Processing Industry : शेतकरी कंपनीची डाळ उद्योगात गगन भरारी

परिणामी, कापसाखालील क्षेत्र शेतकरी कमी करतात. त्याऐवजी कापसाचे प्रक्रियेतून मूल्यवर्धन केल्यास शेतकऱ्यांना अधिक परतावा मिळणे शक्य आहे. स्मार्ट कॉटन प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

राज्यात याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. या पुढील काळात शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन कापसाच्या मूल्यवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

कापसाचे मूल्यवर्धन केल्यास त्यातून अनेक प्रकारचे उपपदार्थ मिळतात. त्याची वेगवेगळी विक्री केल्यास अधिक परतावा मिळतो. कृषी पर्यवेक्षक पंकज कोकाटे यांनी कापूस वसंतराव फळबाग व्यवस्थापन याविषयी माहिती दिली.

इंडो इस्राईल पद्धतीने संत्रा लागवड सध्या फायदेशीर ठरत आहे. यामध्ये संत्रा झाडांची लागवड बेडवर केली जाते. पाण्याकरिता ठिबकचा पर्याय तसेच शास्त्रोक्त पद्धतीने छाटणीवर भर दिला जातो. अशा प्रकारच्या व्यवस्थापनातून संत्रा बाग कीडरोगमुक्त ठेवणे शक्य होते.

Cotton Processing
Water Processing : अन्नपदार्थांतील पाणी क्रियाकलापास प्रभावित करणारे घटक

कपाशी पिकाबद्दल बोलताना ते म्हणाले, की कपाशीवरील मावा किडीचे नियंत्रण करण्यासाठी बरबटी पिकाची लागवड कपाशीसोबत करावी. यामुळे मावा किडीपासून सुरक्षा मिळते.

मावा तुडतुडा, फुलकिडा, पांढरी माशी झाडांचे रस शोषण करणाऱ्या किडीचे व्यवस्थापन नीम ऑइल किंवा दशपर्णी अर्क फवारणी करावी. कृषी सहायक गजभिये, मदनकर, महादेव आर्खेल, मुकुंदा गजभिये, मुरलीधर बोरसे, गणेश पाचपोर यांची या वेळी उपस्थित होती.

कृषितज्ज्ञ आकाश धंदे यांनी सेंद्रिय शेतीबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे वन्यप्राणी नुकसान करतात. त्या पार्श्‍वभूमीवर सरकारने शिवाराला आठ फूट उंचीचे तारकुंपण निःशुल्क उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. ‘ॲग्रोवन’चे वितरण प्रतिनिधी शशांक पावडे यांनी प्रास्ताविक, तर संचालन अशोक ढोके यांनी केले. ॲग्रोवनचे वितरण सहव्यवस्थापक सुनील धांडे यांनी आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com