Nandurbar APMC : नंदुरबार बाजार समितीच्या सभापतिपदी वळवी

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी विक्रमसिंग वळवी, तर उपसभापतिपदी वर्षा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
APMC
APMC Agrowon

Nandurbar News : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी विक्रमसिंग वळवी, तर उपसभापतिपदी वर्षा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध निवडीची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या असंख्य समर्थक व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.

या निवडणुकीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या शेतकरी विकास पॅनेलने दणदणीत विजय संपादन करीत १८ पैकी १७ जागांवर उमेदवार निवडून आले होते, तर हमाल मापाडी मतदार संघातून अपक्ष उमेदवार अशोक आरडे यांनी पाठिंबा दिल्याने सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया एकतर्फी झाली.

APMC
Pune APMC News : पुणे बाजार समितीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले

बाजार समितीच्या सभागृहात गुरुवारी (ता. १८) जिल्हा सहाय्यक उपनिबंधक भारती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सभापती व उपसभापतिपदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. त्यांना सचिव योगेश अमृतकर यांनी साहाय्य केले.

विहित मुदतीमध्ये सभापतिपदासाठी विक्रमसिंग वळवी, तर उपसभापतिपदासाठी वर्षा पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

APMC
APMC Election Result : बच्चू कडूंचे चांदूर बाजार बाजार समितीवर वर्चस्‍व, सभापतीपदी राजेंद्र याऊल

निवड झाल्यानंतर शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी नवनियुक्त सभापती, उपसभापतींचा सत्कार केला. या वेळी कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या.

या वेळी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी. के पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील, पालिकेचे माजी सभापती कैलास पाटील, माजी नगरसेवक परवेज खान, रवींद्र पवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कृष्णदास पाटील, तालुकाप्रमुख डॉ. सयाजीराव मोरे, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच व बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com