
जळगाव : राज्यात गायरान जमिनीवरील अतिक्रमण (Grazing Land Encroachment) काढण्याची राज्य शासनातर्फे कारवाई सुरू येत आहे. ही कारवाई तत्काळ थांबवावी, यासाठी बहुजन वंचित आघाडीतर्फे (Vanchit Bahujan Aghadi) पालकमंत्र्यांच्या पाळधी येथील घरावर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, जळगावातील शिवकॉलनी पुलाजवळच मोर्चेकरांनी पालकमंत्र्यांची गाडी अडविली. या वेळी पालकमंत्र्यांनी रस्त्यावर बसून आंदोलकांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
राज्य सरकारने वास्तव व परिस्थितीची पडताळणी न करता गायरान, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणधारकांची घरे व शेतीवर कारवाई सुरू केली आहे. यामुळे अनेक जण बेघर होणार आहेत. जळगाव जिल्ह्यातही कारवाई सुरू झाली असून, वंचित बहुजन आघाडीने याविरुद्ध आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी (ता. २६) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. त्यात जिल्ह्यातील दोन हजार दोनशे महिला, पुरुष व तरुणांनी भाग घेतला.
येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानापासून मोर्चाला सुरवात झाली. बसस्थानक, सावरकर पुतळामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा पोचला असता, पोलिसांनी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांसोबत आंदोलकांची शाब्दिक चकमक उडाली. आंदोलकांनी बॅरिकेट्स पार करत पाळधीकडे महामार्गावरून मार्गक्रमण केले.
जिल्हा प्रशासन व पालकमंत्री, असा दुहेरी राजकीय दबाव पोलिसांवर होता. पालकमंत्री आमच्या मार्गात जिथे भेटतील, तिथे आम्ही चर्चा करू, असा पवित्रा वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे घेण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील शिवकॉलनीलगत पुलावर आले असता, त्या ठिकाण रस्त्यावर बसून आंदोलकांशी पालकमंत्र्यानी चर्चा केली. त्यांनी शासन दरबारी प्रश्न मांडून तो सोडविण्याचे आश्वासन दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.