Vandri Dam : वांद्री धरण परिसर चित्रीकरणासाठी ‘हॉटस्पॉट’

मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या गांजे ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीतील वांद्री धरण आणि लगतचा परिसराला इन्स्टाग्राम रिल्स मेकर, यू-ट्यूबर, चित्रपट, वेबसीरिजच्या चित्रीकरण करणाऱ्यांची पसंती मिळत आहे.
Vandri Dam
Vandri Dam Agrowon

मनोर : मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या गांजे ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीतील वांद्री धरण (Vandri Dam) आणि लगतचा परिसराला इन्स्टाग्राम रिल्स मेकर, यू-ट्यूबर, चित्रपट, वेबसीरिजच्या चित्रीकरण करणाऱ्यांची पसंती मिळत आहे.

Vandri Dam
Crop Damage Survey : ‘पंचनामे राहिलेल्या शेतकऱ्यांनो संपर्क साधा’

या चित्रीकरणामुळे स्थानिकांना रोजगार, ग्रामपंचायत आणि पाटबंधारे विभागाला महसूल उपलब्ध होत आहे. निसर्गरम्य ठिकाणी चित्रीकरण होत असल्याने हा वांद्री परिसर आकर्षण केंद्र ठरत आहे. वांद्री धरण परिसरात वर्षभरातून साधारणपणे पंधरा ते वीस चित्रीकरण होत आहे.

मुंबईपासून संत्तर किलोमीटरवर अंतरावर आणि मुंबई अहमदाबाद महामार्गालगत गांजे ढेकाळे ग्रामपंचायत वसलेली आहे. महामार्गाच्या पूर्वेला पाच किलोमीटर अंतरावर गांजे गावच्या हद्दीतील वांद्री नदीवर ऐंशीच्या दशकात आदिवासी उपयोजनेतून मातीचा बंधारा बांधण्यात आला होता. या वांद्री धरणाच्या पाण्याचा परिसरातील शेतीच्या सिंचनासाठी उपयोग केला जात आहे. पण धरणाचा जलाशय आणि वांद्री धरण परिसरातील घनदाट जंगलामुळे हा धरण परिसर चित्रीकरणासाठी एक आकर्षणाचे केंद्र झाले आहे.

Vandri Dam
Onion Market : लासलगाव बाजार समितीत कांद्याला ७०० ते ३०५३ रुपये दर

धरणाच्या बुडीत क्षेत्राच्या दक्षिण बाजूकडून दुर्गम भाग असलेल्या जायशेत-बहिरीफोंडा ग्रामपंचायत हद्दीतील ठाकुरपाड्याकडे जाणारा परिसरा हिरवाईने नटलेला निसर्ग आहे. त्यामुळे चित्रीकरणासाठी हा परिसर हॉटस्पॉट ठरत आहेत. चित्रीकरणामुळे ग्रामपंचायत आणि पाटबंधारे विभागाच्या महसुलात वाढ झाली आहे. वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे.

वर्षा पर्यटनांसाठी गर्दी

पावसाळ्यात फेसाळणाऱ्या धबधब्यांवर भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक वांद्री धरण परिसरातील बहिरीफोंडा जायशेत सारख्या दुर्गम भागाकडे येत असतात. जायशेत- बहिरीफोंडा ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूर पाड्याच्या ओहोळ, धबधबा, वांद्री धरणाचा कालवा आणि जायशेत रस्त्यावरील हिरवाईकडे पर्यटक आकर्षित होत असल्याने पावसाळ्यात आठवडयाच्या अखेरचे दोन दिवस वांद्री धरण आणि ठाकुरपाडा भागात पर्यटकांची गर्दी असते.

Vandri Dam
Sugar Export : मे नंतर आणखी साखर निर्यातीस परवानगी शक्य

शासकीय परिपत्रकानुसार दिवसाकाठी पंचवीस हजार रुपये रक्कम आकारून चित्रीकरणाला परवानगी दिली जाते. वर्षभरात सुमारे पंधरा ते सोळा परवानग्या दिल्या जातात. यातून चांगला महसूल मिळत आहे.

निलकमल गवई, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग

गांजे ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीतील वांद्री धरण परिसरात चित्रीकरणासाठी अनेक निर्माते येत आहेत. वर्षाला दहा ते पंधरा चित्रीकरणाच्या युनिटला ग्रामपंचायतीमार्फत परवानगी दिली जात आहे.

सतीश भागवत, ग्रामसेवक, गांजे-ढेकाळे ग्रामपंचाय

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com