Sugar Mill : अडीच वर्षात ‘वारणा’ कर्जमुक्त करणार : डॉ. कोरे

येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्यात येणाऱ्या गळीत हंगामात १६ लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी सांगितले.
Sugar Mill
Sugar MillAgrowon

जि. कोल्हापूर : येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्यात येणाऱ्या गळीत हंगामात १६ लाख टन उसाचे गाळप (Sugar Production) करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (Dr. Vinay Kore) यांनी सांगितले. अडीच वर्षांत कारखाना कर्जमुक्त करण्याची घोषणा त्यांनी केली.

Sugar Mill
Sugar Export : साखरेच्या कोटा पद्धतीमुळे महाराष्ट्राची साखरकोंडी

येथील वारणा सहकारी साखर कारखान्याच्या ६६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत डॉ. कोरे बोलत होते. ते म्हणाले, की वारणा कारखाना संक्रमण काळातून बाहेर पडला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यामुळे प्रतिदिन ११ हजार टनांप्रमाणे सुमारे १६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे.

Sugar Mill
Sugar Export : साखर निर्यात खुल्या की कोटा पद्धतीने?

‘वारणा’ने शेतकरी, कंत्राटदार, वाहतूक यांची गत हंगामातील उसाची सर्व देणी वेळेत दिली. मार्चनंतरच्या उसास प्रतिटन दोनशे रुपये अधिक देणे विचाराधीन आहे.

नुकताच कारखान्याच्या मालकीचा झालेल्या

Sugar Mill
Sugar Mill : अगस्ती साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचडांची सत्ता गेली

आणि देशातील सहकारातील मोठा असलेल्या ४४ मेगावॅट क्षमतेच्या व ३५० कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या ऊर्जांकूर वीजप्रकल्पातून १०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचे उत्पन्न वीज विक्रीतून मिळणार आहे.

यामुळे कारखान्यावरील आर्थिक बोजा कमी होऊन येत्या अडीच वर्षांत कारखाना कर्जमुक्त करण्याचा संकल्प सिद्धीस जाईल.

उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, ऊर्जांकूर प्रकल्पाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, नवशक्तीचे अध्यक्ष एन. एच. पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, कार्यकारी संचालक शहाजी भगत उपस्थित होते. प्रा. चोपडे यांनी सूत्रसंचालन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com