Sugar Season : ‘वसंत’ सुरू करणार

येत्या तीन महिन्यांत साखर कारखाना सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देऊ,’’ असे वचन हिंगोली-उमरखेड-महागावचे खासदार हेमंत पाटील यांनी दिले.
Vasat Sugar Mill
Vasat Sugar MillAgrowon

मुळावा, जि. यवतमाळ : ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची कामधेनू अशी ओळख असलेल्या उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील ‘वसंत’ सहकारी साखर कारखान्याची (Vasant cooperative Sugar Factory) चाके थांबली होती. ती पुन्हा वेगाने सुरू करण्याचा मानस आहे. येत्या तीन महिन्यांत साखर कारखाना (Sugar Mill) सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देऊ,’’ असे वचन हिंगोली-उमरखेड-महागावचे खासदार हेमंत पाटील (Heamant Patil) यांनी दिले.

Vasat Sugar Mill
Sugar Export : निर्यात कोटा निश्‍चितीमुळे साखर कारखानदारांना दिलासा

कारखाना परिसरात सहकुटुंब उपस्थित राहून त्यांनी पूजन केले. या वेळी त्यांच्या सहचारिणी व गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, ‘सकाळ’चे संदीप काळे, बाबूराव कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, संभाजी डांगे, भीमराव चंद्रवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Vasat Sugar Mill
Sugar Mill : केंद्राच्या लुडबुडीमुळे साखर कारखाने अडचणीत

उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याने या विदर्भ-मराठवाडा या सीमावर्ती भागातील लोकांचे जीवनमान बदलविले आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून ‘वसंत’ची चाके थांबली होती. राजकारणामुळेही अनेक बाबी होत नव्हत्या.

राज्यात एकनाथ शिंदे-फडणवीस यांचे सरकार येताच हा कारखाना सुरू करण्यासाठी खासदार पाटील यांनी प्रयत्न केले. आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या मदतीने हा कारखाना सुरू करण्यात येईल.

शेतकऱ्यांचा विकास झाला तरच सर्व जनता सुखी होईल. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून लवकरच कारखाना सुरू करू. किमान दोन लाख हेक्टर उसाचे गाळप करून शेतकऱ्यांना उभारी देऊ.
हेमंत पाटील, खासदार.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com