CET Exam : शारदानगरची वसुधा फडतरे सीईटी परीक्षेत राज्यात प्रथम

ग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित शारदाबाई पवार विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेजची (शारदानगर) विद्यार्थिनी वसुधा गंगाधर फडतरे हिने १०० पर्सेंटाइल गुण मिळवून, सीईटी परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकविला आहे.
CET Exam
CET ExamAgrowon

माळेगाव ः अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती (Agriculture Development Trust Baramati) संचलित शारदाबाई पवार विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेजची (Sharadabai Pawar Vidyaniketan Junior College) (शारदानगर) विद्यार्थिनी वसुधा गंगाधर फडतरे (Vasudha Phadatare) हिने १०० पर्सेंटाइल गुण मिळवून, सीईटी परीक्षेत (CET Exam) राज्यात प्रथम येण्याचा मान पटकविला आहे. वसुधा ही शेतकरी कुटुंबातील आहे.

CET Exam
Agriculture Drone : शासन ‘ड्रोन शेती’च्या प्रसारासाठी प्रयत्न करणार

विशेष म्हणजे वसुधाने कोणतीही खासगी शिकवणी न लावता केवळ महाविद्यालयातील मार्गदर्शन आणि स्वअध्ययनाच्या आधारे हे यश मिळविले आहे. या शिक्षण संस्थेतील १२ विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेंटाइल गुण मिळविल्याचे सीईटीच्या निकालानंतर स्पष्ट झाले. त्यामध्ये पायल शिंदे हिने ९९.९४, राजेश्वरी तावरे हिने ९९.९२, दिग्विजय रायते याने ९९.९२, वैष्णवी निगडे हिने ९९.४४, अनंत काटे याने ९९.४०, शंतनू देशमुख याने ९९.३९, प्रणव निंबाळकर याने ९९.३७, शंतनू सस्ते याने ९९.२२, प्रतीक जाधव याने ९९.९९, अथर्व कुंभार याने ९९.११, हर्षदा बारसकर याने ९९.०२, तर प्राची डोंगरे हिने ९९.०१ पर्सेंटाइल गुण मिळवले.

CET Exam
Agriculture Export Ban : दुर्दैवी निर्यातबंदी

संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, समन्वयक प्रशांत तनपुरे, मुख्याध्यापक सूर्यकांत मुंढे, योगेश झणझण यांनी यशस्वी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.

वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचा फायदा

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी विविध विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन केले जाते. ऑनलाइन परीक्षेचा सराव करून घेतला जातो. जादा तास व शंका निरसनासाठी प्राध्यापकांकडून दिला जाणारा अतिरिक्त वेळ निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या यशामध्ये फायद्याचा ठरला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी ध्यान व योगा आदी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com