पावसामुळे पालेभाज्या सडल्या, पिकांच्या पंचनाम्याची मागणी

आंबेगाव तालुक्यात गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये पालेभाज्या आणि फळभाज्यांचे प्रमाण जास्त असून. शेतात पाणी साचल्यामुळे शेपू, बीट, कोथिंबीर व मेथी आदी तरकारी पिके सडून गेली आहेत.
Vegetable
VegetableAgrowon

महाळुंगे पडवळ, जि. पुणे : आंबेगाव तालुक्यात गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे (Crop Damage Due To Rain) नुकसान झाले आहे. यामध्ये पालेभाज्या आणि फळभाज्यांचे (Vegetable Crop Damage) प्रमाण जास्त असून. शेतात पाणी साचल्यामुळे शेपू, बीट, कोथिंबीर व मेथी आदी तरकारी पिके सडून गेली आहेत. महसूल व कृषी कार्यालयामार्फत तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामे (Survey For Crop Damage) करण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Vegetable
Vegetable : अभ्यासातून प्रगत केली भाजीपाला शेती

कळंब मंडळात शनिवार (ता.९) ते सोमवार (ता.१८) या कालावधीत एकूण २८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे पालेभाज्या वर्गीय पिके सडू लागली आहेत. भुईमुगाच्या शेंगांना मोड फुटले आहेत. सोयाबीन पीक संपूर्ण पिवळे पडले असून, पिकांची वाढ खुंटली आहे. ढगाळ वातावरण, सततचा पाऊस यामुळे कोबी, फ्लॉवर, टोमॅटो व अन्य भाजीपाल्यावर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात भरमसाट वाढ झाली आहे.

Vegetable
Vegetable : भाजीपाला सल्ला

सखल जमिनीमधून पाण्याचा निचरा होत नसल्याने जमिनी उपळल्या आहेत. लौकी, कळंब, चास, महाळुंगे पडवळ, साकोरे आदी गावांतील तरकारी उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. ऊस पिकाच्या सऱ्यांमध्ये दोन फूट पाणी असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

‘‘२५ गुंठे क्षेत्रात शेपू भाजी बियाण्यांची पेरणी केली होती. वीस दिवसांचा शेपू झाला होता, परंतु सतत कोसळत असलेल्या पावसामुळे शेपू पीक पाण्याखाली गेले असून १० ते १५ हजार रुपये नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांची पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत,’’ अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर बरकुल यांनी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com