Mahavikas Aghadi : नारायण राणे, राऊत यांच्यात जिल्हा सभेत शाब्दिक खटके

महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या विकासकामांना आताच्या सरकारने स्थगिती दिल्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात जोरदार शाब्दिक खटके उडाले.
Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadiagrowon

सिंधुदुर्गनगरी ः महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या विकासकामांना आताच्या सरकारने स्थगिती दिल्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यात जोरदार शाब्दिक खटके उडाले.

पालकमंत्री रवींद्र चव्हाणांनी नियमानुसार सभा चालणार असल्याचे स्पष्ट करतानाच जिल्हा विकासासाठी सहकार्य करा, असे आवाहन करीत वादावर पडदा टाकण्याच्या प्रयत्न केला. दरम्यान, जिल्हा नियोजनाचा आराखडा २५० कोटी रुपयांचा असावा यावर सर्वांचे एकमत झाले.

Mahavikas Aghadi
Crop Damage : तूर अन् ज्वारीलाही बसला अतिपावसाचा फटका

जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला केंद्रीय मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे सदस्य राजेश क्षीरसागर, खासदार विनायक राऊत, आमदार नीतेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल आदी उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीलाच खासदार विनायक राऊत यांनी १२ ऑक्टोबरला शासनाने आदेश काढत १ एप्रिल २०२१ पासूनच्या जिल्हा नियोजनाच्या कामांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे विकासकामे ठप्प आहेत, असा मुद्दा उपस्थित केला. या वेळी मंत्री श्री. राणे यांनी या सभेला नियम आहेत, त्या नियमानुसार सभा झाली पाहिजे असे स्पष्ट केले. या वेळी श्री. राऊत यांनी पालकमंत्री सक्षम आहेत, ते उत्तर देतील असे सांगितले. त्याविषयावरून राणे आणि राऊतांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी नियमानुसार सभा चालेल असे स्पष्ट केले.

जिल्हा नियोजनाचा आराखडा १८५ कोटींचा आहे, तो २५० कोटी असणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्याच्या आराखड्यात किमान ६८ कोटींची वाढ करण्यात यावी, अशी सूचना मंत्री राणेंनी केली. २५० कोटींचा आराखडा नेण्यावर सर्वांचे एकमत झाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com