Vidhimandal Adhiveshan : खोके घेऊन भूखंड ओके करणाऱ्यांचा धिक्कार असो

विरोधकांच्या घोषणांनी विधान भवन परिसर दणाणला
vidhimandal adhiveshan
vidhimandal adhiveshan Agrowon

नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले. एनआयटी भूखंड घोटाळा बुधवारी (ता.२१) विधान भवनात गाजला. ‘खोके घेऊन भूखंड ओके करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो’, ‘राजीनामा द्या, राजीनामा द्या.. मुख्यमंत्री राजीनामा द्या,’ अशा घोषणांनी विरोधकांनी विधान भवन परिसर दणाणून सोडला.

vidhimandal adhiveshan
Hiwali Adhiveshan : विरोधकांचे पहिल्याच दिवशी आंदोलन

‘भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘ईडी सरकार हाय हाय, भ्रष्ट सरकार हाय हाय, खोके सरकार हाय हाय’ अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह नाना पटोले, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, रवींद्र वायकर, रोहित पवार, अशोक चव्हाण, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, शशिकांत शिंदे, सुनील राऊत, सुनील प्रभू यांच्यासह विरोधी पक्षाचे सर्वच आमदार उपस्थित होते.



‘एनआयटीचा ८३ कोटींचा भूखंड २ कोटींत देऊन घोटाळा केल्याचा ठपका मुख्यमंत्री व सरकारवर ठेवण्यात आला आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे, असे आमदारांनी या वेळी सांगितले.
.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com