Corruption : भ्रष्टाचारास प्रतिबंधासाठी दक्षता जनजागृती सप्ताह

भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात येणार आहे.
Corruption
CorruptionAgrowon

पालघर : भ्रष्टाचारास (Corruption) प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत ‘दक्षता जनजागृती (Corruption Awareness Week) सप्ताहा’चे आयोजन करण्यात येणार आहे. ‘भ्रष्टाचारमुक्त भारत- विकसित भारत’ ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे.

Corruption
Agriculture : शेती शोषणमुक्त कधी होणार ?

दरवर्षीप्रमाणे राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख, कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थांमार्फत या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Corruption
Agriculture Business : स्वॉट ॲनालिसिसने ओळखा व्यवसायातील बलस्थाने

३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाच्या प्रतिज्ञेने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. विभागप्रमुख, कार्यालयप्रमुख किंवा ज्येष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी, कर्मचारी प्रतिज्ञा घेतील. प्रतिज्ञा घेतल्यानंतर राज्यपाल व मुख्यमंत्री यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखवण्यात येईल.

कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास तक्रार कोठे करावी याबाबत संबंधित नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे. तसेच भ्रष्टाचारास आळा बसण्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असल्याने ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळवण्याचे आवाहन पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांनी केले.

पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.
नवनाथ जगताप, पोलिस उपअधीक्षक, लाच प्रतिबंधक विभाग, ठाणे, कॅम्प पालघर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com