Dighori Gram Panchayat : चाळीस वर्षांनंतर दिघोरीला हक्काची ग्रामपंचायत

यवतमाळ व दारव्हा या तालुक्यांच्या सीमेवर असलेले दिघोरी, वरुड हे गाव गेल्या ४० वर्षांपासून ग्रामपंचायत नसल्याने विकासापासून कोसो दूर होते.
 Gram Panchayat
Gram PanchayatAgrowon

यवतमाळ : यवतमाळ व दारव्हा या तालुक्यांच्या सीमेवर असलेले दिघोरी, वरुड हे गाव गेल्या ४० वर्षांपासून ग्रामपंचायत (Gram Panchayat) नसल्याने विकासापासून कोसो दूर होते. गावाला हक्काची ग्रामपंचायत मिळावी, यासाठी गावातील ग्रामस्थांचा लढा गेल्या आठ वर्षांपासून सुरू होता. या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. शासनाने राजपत्र प्रसिद्ध करून दिघोरी व वरुडला गटग्रामपंचायतीचा दर्जा दिला आहे.

 Gram Panchayat
Sugar Export : मे नंतर आणखी साखर निर्यातीस परवानगी शक्य

स्वातंत्र्याच्या काळानंतर मोझर, इजारा, वरुड, दिघोरी अशी चार गावे मिळून गटग्रामपंचायत तयार करण्यात आलेली होती. त्या काळात गावातील ग्रामस्थ मतदानही करीत होते. ग्रामपंचायतीवर सदस्य निवडणूक दिले जात होते. शासनाने १९८२-८३ मध्ये जिल्ह्यातील तालुक्याची पुनर्रचना केली.

त्यात मोझर हे गाव दारव्हा तालुक्यांत आले. दिघोरी, वरुड इजारा यवतमाळ तालुक्यात गेले. त्यामुळे मूळ ग्रामपंचायत मोझर दारव्हात आल्याने दिघोरी व वरुड इजारा या गावांना ग्रामपंचायतमधून काढले. त्यानंतर या गावांचा कोणत्याही ग्रामपंचायतींत समावेश नव्हता. परिणामी १९८३ पासून दिघोरी व वरुड इजारा हे गाव योजनांपासून वंचित राहिले. २०११ च्या जनगणनेवरून दिघोरी गावाची लोकसंख्या ८०१, तर वरुड इजारा या गावाची लोकसंख्या ४८५ आहे. ही दोन गावे ४० वर्षांपासून मतदानाच्या हक्काला मुकली होती.

 Gram Panchayat
Crop Damage Survey : ‘पंचनामे राहिलेल्या शेतकऱ्यांनो संपर्क साधा’

आठ वर्षांच्या लढ्याला यश

गावातील पुरुषोत्तम राठोड व गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व्हावी व गावाचा विकास व्हावा, यासाठी गेल्या आठ वर्षांपासून लढा सुरू केला होता. गल्ली ते मंत्रालयात अशा चकरादेखील मारल्या. नेत्यांचे उंबरठे झिजविले. त्यांच्या प्रयत्नांना आठ वर्षांनंतर यश मिळाले आहे.

पालकमंत्री संजय राठोड यांनीही ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला. परिणामी दिघोरी, वरुड इजारा या गावांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर झाली. राज्य शासनाने तसे राजपत्र प्रसिद्ध केले. त्यामुळे ग्रामस्थ आनंदी आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com