
पुणे : आदर्शगावाकडे वाटचाल करत असलेल्या इंदापूर तालुक्यातील कडबनवाडीतील वनपर्यटन केंद्र, (Forest Tourism) ऑक्सिजन पार्कला पंतप्रधान कार्यालयाचे (पीएमओ) अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी (Praveen Pardeshi) आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक भावेश पांडव यांनी शनिवारी (ता.१४) यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी याठिकाणी वृक्षारोपण देखील केले.
कडबनवाडी वन पर्यटन केंद्र हे चिंकारा, लांडगे, तरस, गरुड, टिटव्या यांसह अनेक वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे.
हे केंद्र नुकतेच नावारूपाला आले आहे. ऑक्सिजन पार्क म्हणून त्याची एक वेगळी ओळख झाली असून, या ठिकाणी अनेक वन्यजीवांचा अधिवास आहे.
फ्रेंड्स ऑफ नेचर क्लब या ठिकाणच्या वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी सतत प्रयत्नशील राहिला आहे. या पर्यटन केंद्रास भेट दिल्यानंतर परदेशी यांनी सर्वांचेच कौतुक केले.
दरम्यान, प्रवीण परदेशी यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याशी संपर्क साधून या भागाच्या विकासासह इंदापूर तालुक्यात सोलर पंप, वनतळी निर्माण करव्यात वगैरे सूचना दिल्या.
बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीचे संचालक भावेश पांडव यांनी देखील या परिसराची पाहणी केली.
यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, वन विभागाचे प्रादेशिक कार्यालयाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, वन्यजीवतज्ज्ञ तुषार चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, इंदापूर वनपरीक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी, वनरक्षक शेळगाव गणेश बागडे, विशाल शेटे, सामाजिक कार्यकर्ते भजनदास पवार, ॲड. सचिन राऊत, अमोल राजपूत, विजय कांबळे, सरपंच दादासाहेब जाधव, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.