प्रादेशिक समित्यांच्या सीमावर्ती भागांना भेटी

आसाम-अरुणाचल प्रदेशातील दीर्घकालीन सीमाप्रश्नाचे निराकरण करण्याच्या उद्देशाने दोन्ही शेजारील राज्यांच्या प्रादेशिक समित्यांच्या संयुक्त पथकाने येथील रान गिंग कान गावाला भेट दिली.
Assam Arunachal
Assam ArunachalAgrowon

मार्गेरिटा, आसाम (एएनआय) : आसाम-अरुणाचल प्रदेशातील दीर्घकालीन सीमाप्रश्नाचे (Assam Arunachal Border Issue) निराकरण करण्याच्या उद्देशाने दोन्ही शेजारील राज्यांच्या प्रादेशिक समित्यांच्या संयुक्त पथकाने येथील रान गिंग कान गावाला भेट दिली. अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी (ता.३) ही माहिती दिली.

Assam Arunachal
Cotton Production : अमेरिकेतील कापूस उत्पादन ४० टक्क्यांनी घटणार?

आसाम सीमा संरक्षण आणि विकास मंत्री अतुल बोरा आणि अरुणाचल प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कमलुंग मोसांग यांच्या नेतृत्वाखाली आसाम आणि अरुणाचल प्रदेश सरकारच्या संयुक्त पथकाने सीमावर्ती भागाला भेट दिली. या वेळी आसाम-अरुणाचल प्रदेश सीमा समस्यांसाठीच्या प्रादेशिक समितीने संयुक्त भेटीसाठी जाहीर सभेचे आयोजन केले. काही आठवड्यांपूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी नामसाई घोषणेवर स्वाक्षरी केल्यानंतर प्रादेशिक समितीने प्रथमच या भागाला भेट दिली.

Assam Arunachal
Soybean Rate: खाद्यतेलाची आयात वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न

बोरा म्हणाले, ‘‘राज्य सरकारने दोन्ही राज्यांमधील सीमावाद योग्य संवादाने सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. शांततापूर्ण सहमती साधण्यासाठी लोकप्रतिनिधींसोबतची चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे. दोन्ही राज्यांनी नेहमीच बंधुभाव आणि सौहार्द जपला आहे. त्याविषयी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाऊ शकत नाही.’’ तिनसुकिया जिल्ह्याची अरुणाचल प्रदेशाशी लांबलचक सीमा आहे.आसाम-अरुणाचल सीमेवर मार्गेरिटा उपविभागाअंतर्गत ३६ गावे आहेत. तसेच सुमारे ६ गावे सध्या विवादित क्षेत्रात आहेत.

दरम्यान, अरुणाचल प्रदेशचे मंत्री कमलुंग मोसांग यांनीही आसाम सरकारच्या टीमने दिलेल्या भेटीचे कौतुक केले. सीमावर्ती गावांच्या प्रतिनिधींनीही बैठकीत आपल्या समस्या मांडल्या आणि नंतर प्रादेशिक समितीने सदस्यांसोबत बैठक घेऊन पुढील कार्यवाहीबाबत चर्चा केली. या बैठकीला अरुणाचल प्रदेश विधानसभेचे उपसभापती तेसम पोंगटे, भास्कर शर्मा, आमदार मार्गेरिटा एलएसी, फोशम खिमहुन आणि लायसम सिमाई, अरुणाचल प्रदेशचे आमदार अनंत लाल ग्यानी आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com