पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन आता २४ तास घेता येणार

कार्तिकी वारी सोहळ्यानिमित्त १३ नोव्हेंबरपर्यंत सुविधा
Vitthal-Rukmini Darshan
Vitthal-Rukmini DarshanAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

सोलापूर ः कार्तिकीवारीच्या (Kartiki) निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या (Vitthal Rukmini) दर्शनासाठी होणारी वाढती गर्दी लक्षात घेता. आलेल्या वारकऱ्यांना श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन सुलभ व तत्पर होण्यासाठी शुक्रवारपासून (ता. २८) २४ तास दर्शन सुरू ठेवण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

Vitthal-Rukmini Darshan
Soybean Harvesting : सोयाबीनची जवळपास निम्मी काढणी पूर्ण

कार्तिक शुद्ध एकादशी सोहळा चार नोव्हेंबरला होणार असून, या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात सुमारे आठ ते दहा लाख वारकरी येतात. वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, मंदिर प्रशासनाकडून २८ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत २४ तास दर्शन सुरू ठेवण्यात आले असल्याचे व्यवस्थापक पुदलवाड यांनी सांगितले. त्यासाठी शुक्रवारी सकाळी देवाच्या शेजघरातील चांदीचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला.

श्री विठ्ठलास मऊ कापसाचा लोड तर रुक्मिणी मातेस तक्या लावण्यात आला आहे. आजपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळ पूजेपर्यंत (१३ नोव्हेंबर) बंद राहतील. या कालावधीत श्रींची नित्यपूजा, महानैवेद्य, गंधाक्षता हे नित्योपचार सुरू राहतील. नित्योपचाराची वेळावगळता श्रींचे पददर्शन आणि मुखदर्शन २४ तास सुरू राहील.

Vitthal-Rukmini Darshan
Wheat Cultivation : तंत्र गहू लागवडीचे...

प्रतिदिन ४० ते ४५

वारकऱ्यांना दर्शन

विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन २४ तास सुरू केल्याने आता दररोज सुमारे ३५ ते ४० हजार वारकऱ्यांना पददर्शन, तर सुमारे ४० ते ४५ हजार वारकऱ्यांना मुखदर्शन मिळणार आहे. कार्तिकी यात्रा कालावधीत २४ तास दर्शन सुरू केल्याने भाविकांना कमी अवधीत दर्शन होणार असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक पुदलवाड यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com