Election : वर्षातून चार वेळा होणार मतदार नोंदणी

नऊ नोव्हेंबरपासून विशेष शिबिर
Election
Election Agrowon


मुंबई : २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या १ तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची १८ वर्षे पूर्ण होतील, त्यांना ‘९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२’ या विशेष मोहिमेअंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल,’’ अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

Election
Rain Update : जायकवडीतून सहा तासात चार वेळा वाढविला विसर्ग

देशपांडे म्हणाले, ‘‘१९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत मतदार नोंदणी केली जाईल. कालावधी मतदार नोंदणीचा आहे, तसा तो एखाद्याच्या नावासबंधी हरकती घेण्याचाही आहे. तसेच १९ व २० नोव्हेंबर आणि ३ व ४ डिसेंबर या दिवशी राज्यभर विशेष शिबिराचे आयोजन केले जाईल.’’

Election
Geo Tagging : ‘जिओ टॅगींग’द्वारे होणार पीक नोंदणी

‘‘वंचित घटकांसाठी खास शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. महिला आणि दिव्यांगांच्या नाव नोंदणीसाठी १२ व १३ नोव्हेंबर रोजी, तर २६ व २७ नोव्हेंबर रोजी तृतीयपंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला आणि घर नसलेल्या भटक्या व विमुक्त जमातीच्या नागरिकांच्या नाव नोंदणीसाठी राज्यभर विशेष शिबिरे घेतली जातील. तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काउट यांच्या सहकार्याने राज्यभर मतदार नोंदणीची शिबिरे राबविण्यात येतील. शिवाय, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा ‘एनव्हीएपी व्होटर पोर्टल’वर आणि ‘व्होटर हेल्पलाइन या मोबाईल अॅपवर उपलब्ध आहेत,’’ असेही देशपांडे म्हणाले.

गुरुवारी राज्यभर विशेष ग्रामसभा
ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने गुरुवारी (ता. १०) राज्यभर विशेष ग्रामसभांचे आयोजन केले जाईल. या दिवशी राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com