APMC Election Maharashtra : बाजार समित्यांच्या आजी माजी कारभाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला ; राज्यभरात मतदान सुरू

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज (ता. २८) मतदान पार पडत आहे. राज्यातील १४७ बाजार समित्यांसाठी ही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.
APMC Election Maharashtra
APMC Election Maharashtra Agrowon

Maharashtra Bazar Samiti Election : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज (ता. २८) मतदान पार पडत आहे. राज्यातील १४७ बाजार समित्यांसाठी ही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. एकूण २५३ बाजार समित्यांसाठी निवडणूक होत असून यापैकी १८ बाजार समित्या (Agriculture Produce Market Committee) बिनविरोध झाल्या आहेत. दरम्यान, ३० एप्रिलला मतमोजणी पार पडणार असून ग्रामीण भागात (Rural) कोणत्या पक्षाचे वर्चस्व आहे, हे समजणार आहे.

स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी आणि शिवसेना-भाजप अशा थेट लढती होणार आहेत. तर काही ठिकाणी काही काही पक्ष स्वबळावर निवणुकीला सामोरे जात असल्याचे चित्र आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांना आपलेसे करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केले आहे. परंतु मतदार आता कोणाच्या पारड्यात आपल्या मताचे दान टाकणार आणि कोण बाजी मारणार हेही पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती बाजार समित्यांची निवडणूक

आज राज्यभरात १४७ बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या १४३ जागांसाठी निवडणूक होत आहे.

त्यासाठी३२१ जण रिंगणात आहेत. तर जळगाव जिल्ह्यातील १२ कृषी बाजार समित्यांसाठी आज मतदान होत आहे. येथे २१३ जागांसाठी ५४६ उमेदवार रिंगणात आहेत. अमरावती जिल्ह्यातील १२ पैकी ६ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे.

याशिवाय छत्रपती संभाजीनगरमधील ४ बाजार समित्यांसाठीही मतदानांची प्रक्रिया सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातील ६ पैकी वाशिम आणि मानोरा येथील २ बाजार समितीच्या ३६ जागांसाठी मतदान पार पडत आहे.

APMC Election Maharashtra
Jalgaon Apmc Election : बाजार समितीत निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर आता पाडापाडीच्या राजकारणाचा डाव

नगर जिल्हा

संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपापले पॅनेल उभा करत एकमेकांना आव्हान दिले आहे. तर पारनेरमध्ये कट्टर विरोधक असलेले आमदार निलेश लंके आणि विजय औटी यांनी एकत्र येत सुजय विखेंसमोर मोठे आव्हान उभा केले आहे.

जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी आज मतदान पार पडत आहे. या ठिकाणची निवडणूक ही कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर होत नसली तरी नेत्यांसांठी वर्चस्वाची असणार आहे. येथे राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

APMC Election Maharashtra
Nashik Apmc Election Update : नाशिक जिल्ह्यात प्रचार शिगेला पोहोचला

नागपूर जिल्हा

नागपूर जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यापैकी ६ बाजार समित्यांच्या निवडणुका वर्षभरापूर्वी झाल्या आहेत. आता ७ बाजार समितींसाठी निवडणूक होत असून सातपैकी सहा बाजार समित्या काँग्रेसच्या ताब्यात होत्या. तर केवळ उमरेडची बाजार समिती ही भाजपच्या ताब्यात होती.

नाशिक जिल्हा

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीसह १२ बाजार समित्यांची निवडणूक आज पार पडत आहे. निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयारी केली असून उमेदवार व कार्यकर्त्यांची मतदान केंद्राबाहेर गर्दी पाहयाला मिळत आहे.

बीड जिल्हा

बीड जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांपैकी बीड बाजार समिती वगळता इतर सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा असा संघर्ष पाहायला आहे. परळीमध्ये मात्र पुन्हा एकदा पंकजा मुंडे समर्थक विरुद्ध धनंजय मुंडे समर्थक असा संघर्ष पाहायला मिळत आहे.

दरम्यान, बाजार समित्यांना ग्रामीण राजकारणाचे केंद्र मानवे जाते. राज्यात पार पडत असलेल्या बाजार समित्यांच्या निवणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जोरदार तयारी करण्यात आली आहे. बाजार समिती निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ग्रामीण जनतेचा कौल कुणाच्या पदरात पडणारे याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com