Gram Panchayat Election : इंदापूर तालुक्यात २६ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक (सन २०२२) कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी आज रविवार (ता. १८) रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
Gram Panchayats Election
Gram Panchayats ElectionAgrowon

इंदापूर, ता. १७ ः ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक (Gram Panchayat Election) (सन २०२२) कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी आज रविवार (ता. १८) रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. एकूण २६ ग्रामपंचायतींसाठी ११९ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. सदर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी, असे आवाहन तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी केले.

Gram Panchayats Election
Election : सहा आठवड्यांत निवडणूक पूर्ण करा

इंदापूर तालुक्यातील पडस्थळ, हिंगणगाव, अजोती-सुगाव, माळवाडी, पिंपरी खुर्द- शिरसोडी, बिजवडी, झगडेवाडी, डाळज नं. २, डाळज नं.३, डाळज नं. १, न्हावी, थोरातवाडी, कळशी, रणमोडवाडी, जांभ, मानकरवाडी, कुरवली, म्हसोबाचीवाडी, मदनवाडी, लाखेवाडी, बोरी, रेडणी, बेलवाडी, डिकसळ, गंगावळण, सराटी या २६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी ७१ उमेदवार, तर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या २४६ सदस्यांपैकी बिनविरोध झालेल्या ३३ वगळता उर्वरित २१३ जागांसाठी ४७२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

सदर निवडणूक प्रक्रीया यशस्वीपणे राबवण्यासाठी ८३४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आचार संहितेचे पालन व्हावे, मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यात यावे, असे आवाहनही श्रीकांत पाटील यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com