Dhule Planning Committee : धुळे जिल्हा नियोजन समितीच्या नगरपंचायत क्षेत्रासाठी आज मतदान

ग्रामीण निर्वाचन क्षेत्र व मोठे नागरी निर्वाचन क्षेत्र मतदार संघाच्या निवडणुकीत ५ सप्टेंबर २०२२ ला उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने या मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
Election
ElectionAgrowon

धुळे ः धुळे जिल्हा नियोजन समितीच्या संक्रमणकालीन नगरपंचायत क्षेत्र यांच्यात निवडून आलेल्या सदस्यांकडून जिल्हा नियोजन समितीचे (District Planning Committee) सदस्य निवडून देण्यासाठी गुरुवारी (ता.१९) सकाळी आठ ते सायंकाळी पाचदरम्यान मतदान होईल.

शुक्रवारी (ता. २०) सकाळी अकरापासून मतमोजणी होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निर्वाचन अधिकारी (जिल्हा नियोजन समिती, धुळे) सी. वाय. पवार यांनी दिली.

ग्रामीण निर्वाचन क्षेत्र व मोठे नागरी निर्वाचन क्षेत्र मतदार संघाच्या निवडणुकीत ५ सप्टेंबर २०२२ ला उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने या मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

Election
Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा तिढा कायम

४ जानेवारी २०२२ ला संक्रमणकालीन नगरपंचायत क्षेत्र यांच्या निवडून आलेल्या सदस्यांकडून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निवडून देण्यासाठी निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com