Crop Harvesting : कापणी प्रयोगातील मजुरी वाढविली

राज्यात पीक सर्वेक्षण योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या पीककापणी प्रयोगाच्या मजुरीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०१७ पासून देण्यात येणाऱ्या प्रतिदिन १९२ रुपयांऐवजी प्रतिप्रयोग २५६ रुपये मजुरी देण्यात येणार आहे.
Crop Harvesting
Crop HarvestingAgrowon

मुंबई ः राज्यात पीक सर्वेक्षण योजनेअंतर्गत (Crop Survey Scheme) घेण्यात येणाऱ्या पीककापणी प्रयोगाच्या (Crop Harvesting) मजुरीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०१७ पासून देण्यात येणाऱ्या प्रतिदिन १९२ रुपयांऐवजी प्रतिप्रयोग २५६ रुपये मजुरी देण्यात येणार आहे.

सध्या शेतीच्या कामासाठी दिवसाकाठी ३०० रुपयांपासून मजुरी देण्यात येते. त्यामुळे पीक सर्वेक्षण योजनेअंतर्गत पीककापणी प्रयोगासाठी प्रतिदिन १९२ रुपये मजुरीने मजूर मिळणे अवघड झाले होते. त्यामुळे मार्चमध्ये अधिसूचना काढून या मजुरीत वाढ केली होती. मात्र त्याबाबतचा शासन आदेश काढण्यात आला नव्हता.

Crop Harvesting
Soybean Rate : सोयाबीन सुधारण्यास अनुकुल स्थिती

२०१७ मध्ये जुन्या मजुरीच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. १९९५ पासून राज्यातील पीक कापणी प्रयोगासाठी प्रति प्रयोग आणि पीकनिहाय मजुरी दिली जात होती. त्यात बदल करून सरसकट १९२ रुपये प्रतिदिन मजुरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

Crop Harvesting
Cotton Market : बाजारात कापसाची आवक कमी

...या पिकांचा होतो कापणी प्रयोग

भात, बाजरी, नाचणी, खरीप ज्वारी, भुईमूग, रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, तूर, जवस, तीळ, खुरासणी, करडई, मका, सूर्यफूल, कापूस, तंबाखू, ऊस, मूग, सोयाबीन, उडीद, नारळ, सुपारी, आंबा, संत्रा, मोसंबी, काजू, द्राक्षे, केळी, कांदा, टोमॅटो.

‘रोहयो’शी सुसंगत मजुरी

२०१७ पूर्वी प्रतिप्रयोग मजुरी दिली जात होती. मात्र त्यात बदल करून प्रतिदिन १९२ रुपये मजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात आता बदल करून प्रति कापणी प्रयोग २५६ रुपये हा रोजगार हमी योजनेच्या दराशी सुसंगत मजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com