जोरदार पावसाची प्रतिक्षा

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
जोरदार पावसाची प्रतिक्षा
RainAgrowon

पुणे : मॉन्सूनची (Monsoon) वाटचाल, पूर्वमोसमी पावसाचे ढग यामुळे राज्याच्या तापमानात चढ-उतार होत आहे. राज्याच्या निम्या भागात मॉन्सून दाखल झाला आहे. या भागात ऊन सावल्यांचा खेळ सुरू असून, अद्यापही जोरदार पावसाची (Rain) प्रतिक्षा आहे. आज (ता. १५) विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तर कोकणात हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

पूर्व उत्तर प्रदेशापासून मनीपूरपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. कर्नाटक ते केरळपर्यंत पश्चिम किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून कच्छ, नैर्ऋत्य राजस्थान पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. विदर्भात पूर्व मोसमी पावसाच्या ढगांची दाटी झाली असून, राज्यातही तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान होत आहे.

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू असून, मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात अनेक ठिकाणी तापमान चाळीशीपार गेले असून, राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान चाळीशीच्या खाली आले आहे. कोकण, महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरींनी हजेरी लावली.

मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३२.९, नगर ३९.०, धुळे ३४.०, जळगाव ३८.३, कोल्हापूर ३१.६, महाबळेश्वर २४.५, नाशिक ३३.७, निफाड ३८.२, सांगली ३२.९, सातारा ३३.३, सोलापूर ३३.३, सांताक्रूझ ३४.४, डहाणू ३५.६, रत्नागिरी ३२.५, औरंगाबाद ३४.६, परभणी ३७.०, अकोला ३७.९, अमरावती ३८.०, बुलडाणा ३५.२, ब्रह्मपुरी ४१.२, चंद्रपूर ३९.२, गोंदिया ४०.०, नागपूर ४०.६, वर्धा ४०.०, यवतमाळ ३८.५.

मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्याच्या विविध भागात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये ( स्रोत : हवामान विभाग) :
कोकण : लांजा ५०, वैभववाडी, मालवण प्रत्येकी ३०, रत्नागिरी, देवगड, मंडणगड प्रत्येकी २०.
मध्य महाराष्ट्र : मालेगाव ८०, जुन्नर ६०, नंदूरबार, नेवासा प्रत्येकी ४०.
मराठवाडा : पालम, परळी वैजनाथ प्रत्येकी ५०, मानवत, मुखेड प्रत्येकी ४०, आंबाजोगाई, देगलूर, चाकूर, गंगापूर प्रत्येकी ३०, माजलगाव, औरंगाबाद, वाडवणी, पाथरी, कंधार प्रत्येकी २०.
विदर्भ : जेवती, वणी, झरीझमणी, आष्टी प्रत्येकी १०.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सांगली, सोलापूर.
मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड.
विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com