Rain : मुळशीत जोरदार पावसाची प्रतीक्षा

पावसाअभावी भात लावण्या रखडल्या
Rain : मुळशीत जोरदार पावसाची प्रतीक्षा

भुकूम, जि. पुणे ः मुळशी तालुक्यात पावसाने (Rain Update Pune) मोठी उघडीप दिली असून, शिवारातील पाणी कमी झाले आहे. अनेक ठिकाणी भात लावण्या (Paddy Cultivation) रखडल्या असून, शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत (wait For Heavy Rain) आहेत.

Rain : मुळशीत जोरदार पावसाची प्रतीक्षा
paddy cultivation: ओडिशातील भात लागवडीत २० टक्क्यांची घट

तालुक्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाल्यानंतर भात लावणीस वेग आला होता. परंतु जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने मोठी उघडीप दिली. कडक उन्हामुळे शिवारातील, ओढे, पर्हे यांचे पाणी कमी झाले. खाचरात पुरेसे पाणी नसल्यामुळे भात लावणीची कामे रखडली असून, शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Rain : मुळशीत जोरदार पावसाची प्रतीक्षा
Pune Rain : पुणे जिल्ह्यात हलक्या सरी

बराच काळ उघडीप राहिल्यामुळे भात रोपांची उगवण कमी झाली. पावसाच्या उघडिपीमुळे पुनर्लागवडीची कामे रखडली असून, अनेक ठिकाणी भात लागवड होऊ शकली नाही. त्यामुळे लागवड क्षेत्र कमी होऊन उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com