Urea Shortage : अमरावती विभागात युरियासाठी शेतकऱ्यांवर भटकंतीची वेळ

अमरावती विभागातील धामणगाव रेल्वे, बडनेरा या विभागांत क्षमतेअभावी रेक पॉइंटवर निर्बंध लादण्यात आल्याने पाचही जिल्ह्यांमध्ये युरियाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.
Urea Shortage
Urea ShortageAgrowon

अमरावती : अमरावती विभागातील धामणगाव रेल्वे, बडनेरा या विभागांत क्षमतेअभावी रेक पॉइंटवर निर्बंध लादण्यात आल्याने पाचही जिल्ह्यांमध्ये युरियाचा (Urea) मोठ्या प्रमाणात तुटवडा (Urea Shortage) निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर युरियासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

Urea Shortage
Urea: युरियाची चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारचा पुढाकार

हरभरा हे पीक हवेतून नायट्रोजन घेत त्याचा वापर करत असल्याने या पिकाला युरियाची गरज भासत नाही. तशी शिफारसदेखील करण्यात आली आहे. मात्र नजीकच्या काळात शेतकऱ्यांकडून हरभरा पिकाला देखील युरिया देण्यावर भर दिला जात आहे. परिणामी, यंदाच्या हंगामात सर्व दूर युरियाची मागणी वाढली आहे. त्यातच विदर्भात असलेल्या मोजक्याच रेक पॉइंटवर पाच इतक्या संख्येत रेक बुकिंगची सोय आहे.

Urea Shortage
Urea Shortage : शेतकऱ्यांना युरिया मिळेना

त्यामुळे नव्या रेक बुकिंगसाठी रेल्वे नकार दिला आहे. याच कारणामुळे युरियाचा तुटवडा निर्माण झाला असून, शेतकऱ्यांवर भटकंतीची वेळ आली आहे. मेळघाटातील चिखलदरा, धारणी या तालुक्यांमध्ये देखील आदिवासी शेतकऱ्यांद्वारे हरभरा पिकाला युरिया देण्याचे प्रमाण नजीकच्या काळात वाढले आहे.

मात्र युरिया दिल्यामुळे पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढीस लागतो असे निरीक्षण कृषी तज्ञांनी नोंदविली आहे. असे असताना देखील शेतकऱ्यांद्वारे युरिया पिकाला दिला जात असल्याने कीड-रोग वाढीस लागण्याची भीती वर्तवली जात आहे. दरम्यान, शनिवारी (ता.२४) वाशीम रेल्वे स्थानकावर युरियाची एक रेक दाखल झाली. या रेकमधील खताचा पुरवठा अकोल्यासह काही जिल्ह्यांना करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com