पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मिळणार अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवा

कोरोना संकटानंतर दोन वर्षांनतंर होणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा मिळणार आहे.
पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मिळणार अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवा
Palkhi SohalaAgrowon

पुणे ः कोरोना संकटानंतर दोन वर्षांनतंर होणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा मिळणार आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागासह पुणे जिल्हा परिषदेची यंत्रणा कार्यरत राहणार आहे. यासाठी पुणे जिल्हा परिषदेला ६ कोटी ७५ लाखांचा निधी दिली आहे.

तुकाराम महाराज यांच्या पालखीने सोमवारी (ता.२०), तर ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने मंगळवारी (ता. २१) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. कोरोना संकटानंतर होणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची संख्या वाढीची शक्यता धान्यात घेऊन प्रशासनाने आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित केले आहे. या व्यवस्थेमध्ये पाण्यापासून ते वैद्यकीय सेवेचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेमध्ये वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचारी, पाणी टँकर्स शुद्धीकरण, पालखी मार्गावरील पाणी शुद्धीकरण, अत्यवस्थ रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा, पालखी मार्गावरील सर्व हॉटेल व पाणी तपासणी मोहीम, पालखी मार्गावरील खासगी रुग्णालयांमध्ये दहा टक्के खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

पाणी गुणवत्ता सर्वेक्षण

शुद्ध पाण्यासाठी पाणीस्रोतांची यादी निश्चित केली आहे. तेथील पाण्याचे नमुने जैविक तपासणी करण्यात येणार आहे. तर, सातत्याने सर्व स्रोतांच्या पाण्याचे नियमितपणे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील १ हजार ६१५ जलस्रोत निश्‍चित केले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात ४६, सातारा जिल्ह्यात ३७५ आणि सोलापूरमध्ये १ हजार १९४ संख्या आहे. तर, संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील एकूण जलस्रोत : १ हजार ३५७ असून, पुणे जिल्ह्यात-१६, सातारा-३७५ सोलापूर-९६६ जलस्रोतांची संख्या आहे.

धूर फवारणीचे नियोजन

कीटकजन्य आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये पालखी मार्गावरील गावांमध्ये कोरडा दिवस पाळण्यात येणार आहे. पालखी मुक्कामाच्या आधी तीन दिवस धूर फवारणीचे नियोजन आणि मुक्कामाच्या गावांमध्ये ताप रुग्ण व डास आळी सर्वेक्षण करणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com