Aashadhi Wari | वारकऱ्यांना सोई-सुविधा कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री शिंदे

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे (Lata Shinde) यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. महापूजेनंतर विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
Eknath Shinde News | Pandharpur News
Eknath Shinde News | Pandharpur NewsAgrowon

पंढरपूर, जि. सोलापूर : आषाढी एकादशीच्या वारीला (Aashadhi Wari) शेकडो वर्षांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते, अशा या वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात राज्य शासन कोठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (ता. १०) येथे दिली. (Eknath Shinde News)

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे (Lata Shinde) यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. महापूजेनंतर विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

Eknath Shinde News | Pandharpur News
Ekanath Shinde : आषाढी एकादशीनंतर मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा करू: शिंदे

यावेळी मानाचे वारकरी म्हणून मुख्यमंत्र्यांबरोबर मुरली भगवान नवले (वय ५२) आणि सौ. जिजाबाई मुरली नवले (वय ४७, मु.पो. रुई, ता. गेवराई, जि. बीड) या दांपत्याला महापुजेचा मान मिळाला.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री दीपक केसरकर, तानाजी सावंत, दादा भुसे, संजय राठोड, शहाजीबापू पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव उपस्थित होते.

Eknath Shinde News | Pandharpur News
OBC Reservation: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणार?

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागील दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी वारी होऊ शकलेली नाही. त्यामुळे या वर्षी दहा लाखांपेक्षा अधिक वारकरी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. लाखो वारकरी विठू नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहाने चालत आलेले आहेत, या सर्व वारकऱ्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. शासन शेतकरी, वारकरी शेतमजूर व कामगार यांच्यासह राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

Eknath Shinde News | Pandharpur News
OBC Reservation: इम्पिरीकल डेटा तयार; बांठीया समितीने सोपवला अहवाल

शासन सर्वसामान्यांचे

राज्यात कृषी, उद्योग, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रासह अन्य सर्व क्षेत्रात चांगली कामे केली जाणार असून, विकासाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच शासन सर्वसामान्यांचे आहे, ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याच्यादृष्टीने प्रयत्न राहतील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

शेतकरी आत्महत्या थांबवण्याचे प्रयत्न

राज्यात या वर्षी पावसाला उशिरा सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी व महापुराची परिस्थिती निर्माण झालेली असली, तरी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. चांगला पाऊस पडल्यास चांगले पीक येऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल. शासन शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmers Suicides) थांबवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Eknath Shinde News | Pandharpur News
Maharashtra Farmer: महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करू: मुख्यमंत्री

मानाच्या वारकरी दाम्पत्याला एसटीचा मोफत पास

या कार्यक्रमात मानाच्या वारकरी दांपत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच राज्य परिवहन महामंडळाकडून (Maharashtra State Transport) वर्षभरासाठी देण्यात येणाऱ्या मोफत पासचे वितरणही श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक सुजय जाधव, उपमहाव्यवस्थापक अजित गायकवाड व विभाग नियंत्रक विलास राठोड उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com