Weather Update : राज्यात काही ठिकाणी मुसळधारेचा इशारा

कोकणात पावसाचा जोर आता कमी झालाय. तरी घाटमाथा आणि इतर काही भागांत जोरदार पाऊस होत आहे. मंगळवारी कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर पुणे जिल्ह्यात मात्र पावसाने उघडीप दिल्याची स्थिती होती.
Weather Updates
Weather UpdatesAgrowon

पुणेः राज्याच्या बहुतांश भागांत मंगळवारी पावसाने (Rain Update In Maharashtra) उघडीप दिली होती. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत जोरदार सरी (Heavy Rain) बरसल्या. मात्र पावसाचा जोर ओसरला. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) उद्या सकाळपर्यंत पुणे, पालघर, नाशिकसह विदर्भातील सर्वंच जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येळो अलर्ट जारी केला.

Weather Updates
Kharip Sowing: मराठवाड्यात ४१ लाख ४३ हजार हेक्टरवर पेरणी

कोकणात पावसाचा जोर आता कमी झालाय. तरी घाटमाथा आणि इतर काही भागांत जोरदार पाऊस होत आहे. मंगळवारी कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर पुणे जिल्ह्यात मात्र पावसाने उघडीप दिल्याची स्थिती होती. सातारा जिल्ह्यातही पावसाची उघडीप दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांत राहूनराहून जोरदार पाऊस पडत आहे. मात्र जिल्ह्यात पावासाचा जोर कमी आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी कमी होतेय. तर सांगली जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाची रिमझिम पुन्हा सुरू झाली. तर शिराळा तालुक्यातदेखील पुन्हा पाऊस सुरू झाला.

Weather Updates
Nagpur Rain : नागपूर विभागात सरासरी ७५.६ मिलिमीटर पाऊस

मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी झाल्या. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील बहुतांश मंडळात पाऊस झाला. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील काही मंडळांत पावसाचा जोर अधिक होता. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही पाऊस हजेरी लावत आहे. नांदेड जिल्ह्यातील काही भागांत मंगळवारीही जोरदार सरी बरसल्या. तर परभणी जिल्ह्यातील काही मंडळांत मध्यम पाऊस झाला.

खानदेशातही राहून राहून पावसाच्या सरी कोसळत आहे. जळगाव, नंदुरभार जिल्ह्यांत पावसाचं प्रमाण तुलनेने जास्त आहे. धुले जिल्ह्यातही चांगला पाऊस होतय. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीवर वाढ झालेली आहे. वाढणारे तण, मर रोगाची भीती यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

विदर्भात अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांतील काही भागांत जोरदार पाऊस होत आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही भागांतील पूरस्थिती अद्याप कायम आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक मंडळांत पावसाने हजेरी लावली. तर अकोला जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदी, नाल्यांतील पाण्याची पातळी वाढण्याचे प्रकार घडले आहेत. मूर्तिजापूर तालुक्यात दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी पुराचे पाणी शेतात घुसल्याने पीक व घरांचे मोठे नुकसान झाले.

तर हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत पुणे, नाशिक आणि पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. तर विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com