Beed News: प्रश्न मार्गी न लागल्यास ट्रॅक्टर मोर्चा

शेतकरी प्रश्नावर प्रगती न झाल्यास २५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावरील ट्रॅक्टर मोर्चाचा इशारा किसान सभेचे अजय बुरांडे यांनी बैठकीत दिला.
Tractor March in Beed due to Farmer Issues
Tractor March in Beed due to Farmer IssuesAgrowon

Beed News : शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी (ता. ९) जानेवारीच्या धरणे आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. १७) किसान सभेच्या (Kisan Sabha) शिष्टमंडळाला प्रगती सभागृहात बैठकीसाठी आमंत्रित केले होते.

शेतकरी प्रश्नावर प्रगती न झाल्यास २५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावरील ट्रॅक्टर मोर्चाचा (Tractor March) इशारा किसान सभेचे अजय बुरांडे यांनी बैठकीत दिला.

किसान सभेच्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठं नुकसान झाले होते. शासनानेही ४०० कोटी रुपयांची तरतूद करत पैसे महसूल प्रशासनानाकडे वर्ग केले होते.

परंतु, शासनाने नंतर वेगळा शासकीय निर्णय काढत मदत डीबीटी प्रणालीद्वारे देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी प्रशासने शेतकऱ्यांची बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व इतर माहिती संकलित करण्याचे काम हाती घेतले होते.

ती मोहीम संथ असून ७० टक्के शेतकऱ्यांचीच माहिती संकलित झाली असे किसान सभेने निदर्शनास आणून देत, ज्यांची माहिती पूर्ण आहे ती शासनाकडे पाठवून त्वरित अनुदान वाटपाचा मार्ग मोकळा करावा असा आग्रह धरला व तो जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केला.

शुक्रवारी रात्रीपर्यंत सदर माहिती शासनास पाठवणार असल्याचे स्पष्ट केल्याचे श्री. बुरांडे म्हणाले.

सततचा पाऊस पडल्यामुळे नुकसान झालेले परंतु अतिवृष्टीतून वगळलेले वडवणी, धारूर, पाटोदा व शिरूर कासार तालुक्यांना अनुदान देण्यात यावे अशी मागणी किसान सभेने केली.

तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनास पाठवला आहे अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळास दिली.

Tractor March in Beed due to Farmer Issues
Mumbai Morcha: महाविकास आघाडीच्या मोर्चात विविध संघटना सहभागी

पीकविमा वाटपातील तफावतीचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर, किसान सभेच्या शिष्टमंडळाला उत्तर देताना पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी, सर्व शेतकऱ्यांची महसुलनिहाय, पीकनिहाय किती विमा भरपाई देय आहे, किती अदा केली व किती बाकी आहे अशा गावनिहाय याद्या तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे एका आठवड्यात देण्यात येतील.

त्यात शेतकऱ्यांनी आपले नाव व माहिती पाहून त्यांच्या तक्रारी असतील तर कळवाव्यात, त्या निकाली काढण्यात येतील असे कळवले.

किसान सभेकडून बैठकीत, कॉ अजय बुरांड कॉ दत्ता डाके, कॉ. मोहन लांब, कॉ, कांशीराम शिरसाट, कॉ जगदीश फरताडे कॉ कृष्णा सोळंके, कॉ मनोज देशमुख, कॉम्रेड दादासाहेब शिरसाट, कॉम्रेड अशोक डाके, कॉम्रेड भास्कर डापकर, कॉम्रेड जगन्नाथ घारे इत्यादी प्रतिनिधींनी बाजू मांडली तर प्रशासनाकडून, जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा, निवासी जिल्हाधिकारी संतोष राऊत, तहसीलदार लटपटे, कृषी विभाग, महावितरण, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता आदींनी हजेरी लावली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com