तळकोकणात मुसळधार पावसाचा इशारा

मॉन्सून मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल
तळकोकणात मुसळधार पावसाचा इशारा
Heavy RAinAgrowon

पुणे : मॉन्सून कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल झाल्याने किनारपट्टीवर ढगांची दाटी (Cloudy Weather) झाली आहे. कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. आज (ता. १२) तळकोकणात मुसळधार पावसाचा इशारा (Prediction Of Torrential Rain) देण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागातही वादळी वारे, मेघगर्जना विजांसह पावसाचा इशारा (Rain Prediction) हवामान विभागाने दिला आहे.

उत्तर प्रदेशपासून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. उत्तर महाराष्ट्रापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत किनापरट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. दक्षिण गुजरातपासून मध्य अरबी समुद्रापर्यंत समुद्र सपाटीपासून ३.१ ते ४.५ किलोमीटर उंचीवर हवेचा आणखी एक कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ढगांची दाटी झाली आहे. कोकणात पावसाने जोर धरला आहे. शनिवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्गमधील सावंतवाडी १४० मिलिमीटर, रायगडमधील श्रीवर्धन १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पावसाळी हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. विदर्भातील उष्ण लाट कमी झाली असून, शनिवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात अद्यापही तापमान चाळीशीपार असून, उर्वरित राज्यात कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे.

शनिवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३६.०, नगर ३८.६, धुळे ४०.०, जळगाव ४०.८, कोल्हापूर ३२.६, महाबळेश्वर २६.८, मालेगाव ४०.२, नाशिक ३४.६, निफाड ३७.०, सांगली ३३.५, सातारा ३४.५, सोलापूर ३५.२, सांताक्रूझ ३४.४, डहाणू ३४.६, रत्नागिरी ३२.६, औरंगाबाद ३५.२, परभणी ३८.५, नांदेड ३७.६, अकोला ३६.२, अमरावती ३८.४, बुलडाणा ३७.०, ब्रह्मपुरी ४२.५, चंद्रपूर ४२.४, गोंदिया ४२.४, नागपूर ४१.२, वाशीम ३८.५, वर्धा ४२.०, यवतमाळ ४१.०.

शनिवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मि.मी) :

कोकण : कुलाबा ६२. सांताक्रुझ ४१, पालघर ३४, वसई ३७, म्हसळा ४०, श्रीवर्धन १००, हर्णे ५२, लांजा ७०, रत्नागिरी ७६, देवगड ५२, कणकवली ५६, कुडाळ ५२, मालवण ८५, रामेश्वर ४३, सावंतवाडी १४०, वेंगुर्ला ९२.

मध्य महाराष्ट्र : पुणे २५.

विदर्भ : देऊळगाव राजा ३०, लोणार २०, मलचेरा २०, भामरागड २०, वणी २०.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

वादळीवाऱ्यासह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : पालघर, ठाणे, रायगड.

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com