Rain Updates Marathi: राज्यात काही भागांत मुसळधारेचा इशारा

कोकणात (Kokan) शनिवारी अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला. तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडल्या.
Weather Updates
Weather UpdatesAgrowon

पुणेः राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा (Rainfall) जोर आता ओसरला. शनिवारी अनेक भागांत पावसाने उघडीप दिली होती. तर काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक आणि विदर्भात जोरदार वापसाचा येलो अलर्ट दिला.

कोकणात (Kokan) शनिवारी अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला. तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडल्या. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत पावसाचा जोर ओसरला. मात्र अधुनमधुन पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. वाऱ्यांसह पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळुन पडत आहेत.

Weather Updates
Rain Updates: मराठवाड्यात पावसाची उसंत

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा जास्त होता. मात्र इतर भागांत हलका पाऊस होता. शनिवारी पुणे जिल्ह्यात ऊन पावसाचा खेळा पाहायला मिळाला. सांगली जिल्ह्यातही उसंत घेतली.

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली. साताऱ्याच्या इतर भागांत पावसाचा जोर मात्र ओसरला. अधूनमधून पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी येत आहेत. नगर जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने उघडीप दिली.

Weather Updates
Crop Insurance: वऱ्हाडात ७८ हजार शेतकऱ्यांनी काढला पीकविमा

विदर्भात सर्व दूर पावसाचा जोर ओसरला. मात्र गडचिरोली जिल्ह्यात काही मार्गांवरील वाहतूक शनिवारी देखील ठप्प होती. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत काही भागांत जोरदरा पाऊस होत आहे. मराठवाड्यातही पावसाचा जोर कमी राहीला. मात्र 3 लाख 38 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 3 लाख 20 हजार हेक्टरला फटका बसला. तर 35 जणांना नैसर्गिक आपत्तीमुळे आपला जीव गमवावा लागला. जवळपास 296 दुधाळ तर ११८ ओढकाम करणाऱ्या लहान मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला. खानदेशातही शनिवारी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे सकाळपासून सूर्यदर्शन झाले.

दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्यानं आंतरमशागतीच्या कामांना वेग आला. शेतकऱ्यांनी तणनियंत्रण, कीटकनाशक फवारण्या सुरु केल्या. मात्र कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत पावसाची शक्यता व्यक्त केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com