Weather Update : राज्याच्या काही भागांत मुसळधारेचा इशारा

राज्याच्या अनेक भागांत पावासाचा धुमाकूळ सुरुच आहे. सोबतच गुजरात आणि कर्नाटकातही पावसाचा जोर कायम आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

पुणेः राज्याच्या अनेक भागांत पावासाचा धुमाकूळ (Heavy Rainfall In Maharashtra) सुरुच आहे. सोबतच गुजरात आणि कर्नाटकातही पावसाचा जोर (Rain Force) कायम आहे. हवामान विभागाने (Weather Department) राज्यातील पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नाशिक आणि गडचिरोली जिल्ह्यांत आज पावसाचा रेड अलर्ट (Red alert Of Rain) जारी केला.

गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. केरळमध्येही पावसाची रिपरिप सुरुच आहे. संपूर्ण केरळ राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविला. तर मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले. कर्नाटकातही पावसाचा जोर वाढला. अनेक ठिकाणी भुस्खलन झाले. तर घरे, शाळांचेही नुकसान झाले. पावसामुळे नद्यांची पाणीपातळी वाढत आहे. त्यामुळे कृष्णा आणि कावेरी नदीकाठच्या नागरिकांना हलविण्यात आले. मध्य प्रदेशात अनेक भागांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला.

Heavy Rain
Heavy Rain: परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ८२ मंडलामध्ये पाऊस

गुजरातमध्ये पावसाचा कहर सुरुच आहे. येथे विविध घटनांमध्ये आत्तापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाला. यापैकी सात मृत्यू सोमवारी झाले. तर हजारो नागरिक पुरामुळे संकटात सापडले. लोकांना जिवनाश्यक वस्तूही मिळत नाहीत. पुराच्या पाण्यात जनावरेही वाहून जात आहेत. दक्षिण गुजरातमधील डांग, नवसारी, तापी आणि वलसाड जिल्ह्यांना तर मध्य गुजरातमधील पंचमहल, छोटा उदेपूर आणि खेडा जिल्ह्यांना पुराचा फटका बसला. हवामान विभागाने आजही गुजरातमधील पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी केला.

Heavy Rain
Grape : पाऊस आणि वाढत्या आर्द्रतेमुळे द्राक्ष बागांवर डाऊनीचा प्रादुर्भाव

राज्यातही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि इतर भागांत पावसाची रिपरिप सुरुच आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील काही भागांत जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम होता. सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून पावसाची संततधार सुरु होती. दिवसभर पाऊस बरसतच राहिला. सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर, पाटण, जावळी, सातारा, खंडाळा, वाई तालुक्यांत बहुतांश भागात संततधार पाऊस सुरुये. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या सुरी सुरूये. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होतेय. सांगली जिल्ह्यातही काही भागांत मुसळधार पाऊस पडला.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी होता. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाने सुरुवात केली. त्यामुळे नुकतीच घटलेली नद्यांची पाणीतळी पुन्हा वाढत आहे. विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. खानदेशात जळगाव जिल्ह्यात तापी, गिरणा नदीला पूर आला. तसेच धुळ्यातील पांझरा-कान, नंदुरबारमधील सुसरी, गोमाई नद्यादेखील प्रवाही झाल्या आहेत. सातपुड्यातही पावसाचा धुमाकूळ सुरू आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com