Water Wastage : मिर्झापूर सिंचन प्रकल्पातून पाण्याची मोठी नासाडी

शिरपूरपासून जवळच असलेल्या मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पाच्या गेटमधून मागील कित्येक दिवसांपासून रात्रीच्यावेळी अज्ञात व्यक्ती पाणी सोडत आहेत. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे.
Water Waste
Water WasteAgrowon

Mirzapur Irrigation Project शिरपूरजैन, जि. वाशीम ः येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्पाची (Irrigation) सुरक्षा रामभरोसे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या प्रकल्पातून धरणाच्या गेटमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी (Water Wastage) अज्ञात व्यक्तीकडून करण्यात येत आहे. हे पाणी नदीतून वाहत आहे. याकडे संबंधितांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

Water Waste
Ujani Canal : उजनी कालव्याची दुरुस्ती संथगतीने सुरू

शिरपूरपासून जवळच असलेल्या मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पाच्या गेटमधून मागील कित्येक दिवसांपासून रात्रीच्यावेळी अज्ञात व्यक्ती पाणी सोडत आहेत. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे.

मागील काही दिवसांपासून नदीपात्रामध्ये मोठ्या पाण्याचा विसर्ग होत आहे. हा खोडसाळपणा थांबवण्याची गरज आहे. यावर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्प हा तुडुंब भरला होता.

Water Waste
Irrigation Scheme : ‘बोरी-अंबेदरी’मुळे लाभक्षेत्रात शाश्वत सिंचन सुविधा

अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पाइपलाइनद्वारे शेतांपर्यंत पाणी आणले आहे. तसेच लागतच्या परिसरामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये सुद्धा कमालीची वाढ झाली आहे.

गत काही दिवसांपासून या प्रकल्पातून रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्ती धरणाचे गेट उघडून त्यामधून पाणी सोडत आहे. सकाळी गेट पुन्हा बंद केले जाते. सदर बेकायदेशीर कृत्यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर शेती सिंचनाखाली आली आहे. अज्ञात व्यक्ती गेट उघडून पाणी सोडतात. त्यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा होऊ शकतो. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने लक्ष देऊन तत्काळ पोलिस कारवाई करावी.

- गणेश इरतकर, प्रगतशील शेतकरी, शिरपूर जैन, जि. वाशीम

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com