Water Wastage : सावरगाव येथील प्रकल्पातील पाण्याची कालव्यातून नासाडी

यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने धरण काठोकाठ भरले होते. दरवर्षी सातत्याने भरणाऱ्या धरणाच्या देखभाल व दुरुस्तीचा मोठा अनुशेष मागील अनेक वर्षांपासून तयार झालेला आहे.
Water Wastage
Water WastageAgrowon

मंगरूळपीर, जि. वाशीम ः तालुक्यातील सावरगाव कान्होबा येथील जलसंधारण विभागाच्या (Department Of Water Resources) अखत्यारित असलेल्या प्रकल्पातील पाण्याचा मोठा विसर्ग (Water Discharge) काही दिवसांपासून होत आहे. मुबलक पाणीसाठा (Water Storage) कमी होत असून प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

Water Wastage
Irrigation Scheme : कुऱ्हा वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता

यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने धरण काठोकाठ भरले होते. दरवर्षी सातत्याने भरणाऱ्या धरणाच्या देखभाल व दुरुस्तीचा मोठा अनुशेष मागील अनेक वर्षांपासून तयार झालेला आहे.

Water Wastage
Irrigation Scheme : ‘पाडळसे सिंचन’साठी वाळू मिळेना

दुरुस्ती आणि देखभालीसाठी या धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतशिवारात पोहोचवण्यासाठी बांधण्यात आलेला मुख्य कालवा पूर्णतः कालबाह्य झाला आहे. धरणाच्या भिंतीपासून सुरुवात झालेला कालवा गळका झाल्याने अपेक्षेपेक्षा २५ टक्के सुद्धा सिंचनाची क्षमता यामुळे साध्य करणे कठीण झाले आहे.

सावरगाव येथील मोठ्या जलप्रकल्पामुळे प्रारंभी सावरगाव कान्होबा, खापरी कान्होबा, साळंबी आणि काही प्रमाणात चिखलागडच्या शेतकऱ्यांना सुद्धा शेतीसाठी पाणी मिळत होते. अनेक वर्षे कालवा दुरुस्ती न झाल्याने आता पाण्याचा अपव्यय होत आहे. शेतकऱ्यांनी पाणी वापरासाठीचा कर भरण्याची अपेक्षा संबंधित विभागातील अधिकारी व्यक्त करीत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com