Ujani Dam : उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा विसर्ग वाढवला

पुणे जिल्ह्यातील धरणाकडून उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कायम राहिल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
Ujani Dam
Ujani DamAgrowon

सोलापूर ः पुणे जिल्ह्यातील धरणाकडून उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग (Water Inflow In Ujani Dam) कायम राहिल्याने धरणाच्या पाणी पातळीत (Water Level Ujani Dam) वाढ होत आहे. परिणामी, पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उजनी धरणातून पुढे भीमा नदीत (Bhima River) शनिवारी (ता. १०) ६१ हजार ६०० क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात येत आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. त्यामुळे तिकडून अतिरिक्त पाणी उजनी धरणाकडे सोडण्यात येत आहे. शनिवारी दौंडकडून जवळपास ४१ हजार ३३ क्युसेक इतके पाणी उजनी धरणामध्ये मिसळत होते.

Ujani Dam
Ujani Dam : ‘उजनी’च्या पाणीसाठ्यात पुन्हा वाढ; विसर्ग सुरू

परंतु धरणाची पाणी पातळी आधीच १०७ टक्क्यांवर पोचल्याने संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी उजनीतूनही पुढे भीमा नदीत सुमारे ६१ हजार ६०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. या पद्धतीने धरणात येणारे पाणी आणि सोडले जाणारे पाणी याचे नियंत्रण करत परिस्थिती हाताळण्यात येत आहे. त्याशिवाय मुख्य कालव्याला १५०० क्युसेक, वीजनिर्मितीसाठी १६०० क्युसेक, सीना माढा योजनेला २९६ क्युसेक आणि बोगद्याला ९०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

उजनीत १०७ टक्के पाणीसाठा

सध्या उजनी धरणाची पाणी पातळी शंभर टक्क्यांच्याही पुढे गेली आहे. शनिवारी (ता.१०) धरणामध्ये एकूण पाणी पातळी ४९७.१८० मीटरपर्यंत होती. तर एकूण पाणीसाठा १२१.४४ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त साठा ५७.७८ टीएमसी एवढा राहिला. या पाण्याची टक्केवारी १०७.८५ टक्के एवढी राहिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com