मुळा धरणातून गतवर्षीपेक्षा लवकर पाणी विसर्ग

नगर जिल्ह्यातील मुळा धरण सर्वात मोठे धरण असून, २६ टीएमसी याची पाणी क्षमता आहे. धरणाच्या पाण्याचा राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी तालुक्यांना फायदा होतो.
Mula Dam
Mula DamAgrowon

नगर : जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या मुळा धरणातून (Mula Dam) गेल्यावर्षीपेक्षा यंदा आधीच पाण्याचा विसर्ग (Water Discharge) सुरू केला आहे. धरणात सध्या साडेपंचवीस टीएमसी पाणीसाठा स्थिर ठेवून ६ हजार क्युसेकने दोन दिवसांपासून पाणी विसर्ग केला जात आहे. पाणलोट क्षेत्रात (Mula Dam Catchment Area) पाऊस सुरू असल्याने साडेनऊ हजार क्युसेकने आवक सुरू होती.

Mula Dam
Rain fed Agriculture : कोरडवाहू शेती विकासासाठी नवे धोरण

नगर जिल्ह्यातील मुळा धरण सर्वात मोठे धरण असून, २६ टीएमसी याची पाणी क्षमता आहे. धरणाच्या पाण्याचा राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी तालुक्यांना फायदा होतो. यंदा १४ ऑगस्ट रोजी धरणाचे दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. १६ ऑगस्ट रोजी पाणीसाठा साडेपंचवीस टीएमसी पाणीसाठा स्थिर ठेवून नव्याने जमा होणारे पाणी धरणातून नदीपात्रात सोडले आहे. धरण परिचालन सूचीनुसार १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान धरण पूर्ण क्षमतेने २६ हजार दशलक्ष घनफूट भरले असल्याचे जाहीर केले जाते.

Mula Dam
Ujani Dam : उजनी धरण अखेर शंभर टक्के भरले

मात्र, यंदा धरण एक महिना आधीच भरले आहे. यंदा सलग चौथ्या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरणार आहे. पाणलोट क्षेत्रातील पाऊस व धरणातील नवीन पाण्याची आवक याचा आढावा घेऊन आणि विसर्ग केले जात आहे. मंगळवारी (ता.१६) धरणात साडेनऊ हजार क्युसेकने पाण्याची आवक होत असून सहा हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. डाउनलोड क्षेत्रात पाऊस सुरूच आहे मंगळवारी (ता.१६) सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासांत घाटघरला १२५, रतनवाडीला ११३, वाकी ८३, भंडारदरा १०९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

भंडारदऱ्यातून अडीच हजार, निळवंडेतून आठ हजार, ओझर बंधाऱ्यातून साडेदहा हजार, नांदुर मधमेश्वर बंधाऱ्यातून पंधरा हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत असल्यामुळे मुळा प्रवरा गोदावरी नदीला पूर आला आहे. भीमा नदीतूनही ३५ हजार क्युसेकने पाणी वाहत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com