‘जायकवाडी’तील विसर्ग वाढविला

जायकवाडीतून १८ दरवाजे मंगळवारी (ता.१६) रात्री ११ ते १२ वाजे दरम्यान दोन फुटांवरून अडीच फूट उघडण्यात आले होते. तर बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अडीच फुटाणे उघडून ४७ हजार ७६० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता.
Jaykwadi Dam
Jaykwadi DamAgrowon

औरंगाबाद : गत काही दिवसांपासून जायकवाडीतून (Jaykawadi Dam) सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गात (Water Discharge Jaykwadi Dam) बुधवारी (ता.१७) वाढ करण्यात आली आहे. आधी अडीच फूट उघडलेले १८ दरवाजे आता साडेतीन फूट उघडून बुधवारी दुपारी दीड ते दोन वाजे दरम्यान ६६०२४ क्युसेकने गोदावरीच्या नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला.

Jaykwadi Dam
Koyana Dam : कोयना धरणातून विसर्ग सुरू

नगर, नाशिक भागांत झालेल्या पावसामुळे त्या भागातील प्रकल्पांमधून अलीकडे दोन-तीन दिवसांत गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. जायकवाडीतून १८ दरवाजे मंगळवारी (ता.१६) रात्री ११ ते १२ वाजे दरम्यान दोन फुटांवरून अडीच फूट उघडण्यात आले होते. तर बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अडीच फुटाणे उघडून ४७ हजार ७६० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता.

दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रकल्पात ७१ हजार २२८ क्युसेकने आवक सुरू होती. त्या वेळी विसर्ग ५७,१९२ क्युसेक होता. दुपारी दीड ते दोन वाजताच्या सुमारास प्रकल्पाचे तीन फूट उघडलेले १८ दरवाजे साडेतीन फूट करून सांडव्याद्वारे ६६०२४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना जायकवाडी प्रकल्प प्रशासनाने दिल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com