Rabi Irrigation : अकरा धरणांतून रब्बीसाठी आवर्तन

डाव्या व उजव्या अशा दोन्ही कालव्यांत पाणी सोडले आहे. याचा फायदा आंबेगाव, शिरूर, खेड, इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर तालुक्यांतील शेतकऱ्यांना होत आहे.
Water News
Water NewsAgrowon

पुणे : रब्बी हंगामातील (Rabbi Season) विविध पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. या पिकांसाठी पाण्याची अडचण येऊ नये म्हणून जिल्ह्यातील अकरा धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे.

डाव्या व उजव्या अशा दोन्ही कालव्यांत (Canal) पाणी सोडले आहे. याचा फायदा आंबेगाव, शिरूर, खेड, इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर तालुक्यांतील शेतकऱ्यांना होत आहे.

पावसाळ्यात पश्‍चिम भागात झालेल्या पावसामुळे धरणे भरून वाहिली. जिल्ह्यातील २६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १९८.३४ टीएमसी एवढी आहे. त्यापैकी धरणांत २०२.६७ टीएमसी म्हणजेच १०२ टक्के पाणीसाठा झाला होता.

गेल्या अडीच महिन्यांत पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने आता धरणांत १७२ टीएमसी म्हणजेच ८७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. रब्बी हंगाम सुरू असल्याने जिल्ह्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांनी पिकांसाठी धरणांतून पाणी सोडण्याची मागणी केली होती.

त्यानुसार पाटबंधारे विभागाने नुकतेच पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना ‘टेल टू हेड’ या पद्धतीने पाण्याचे वितरण करण्यात येणार आहे.

पूर्व भागातील शेतकऱ्यांनी डाव्या, उजव्या कालव्यातील पाण्यावर हरभरा, गहू, ज्वारी, सूर्यफूल, मका, फळबागा आदी पिके घेतली आहेत. याशिवाय कांदा, बटाटे, भाजीपाला यांचेही उत्पादन घेतले आहे.

दरम्यान, सोडलेल्या पाण्याचा कालावधी निश्‍चित नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. मे महिन्यापर्यंत पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे.

त्यानुसार पाटबंधारे विभाग योग्य ते नियोजन करीत आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात येत आहे.

Water News
Water Storage : लघू प्रकल्पांमध्ये ५८ टक्के पाणीसाठा

धरणनिहाय विसर्ग स्थिती

पुणे जिल्ह्यातील माणिकडोह धरणातून १३०० क्युसेकने, चिल्हेवाडी १९१, तर भामा आसखेड धरणातून ७७९ क्युसेकेने सांडव्यातून विसर्ग सोडण्यात आला आहे. तर पिंपळगाव जोगे २६५ क्युसेक, येडगाव १४००, डिंभे ६००, घोड ४५०, विसापूर ८०, चासकमान ५५०, वीर ८२७, तर उजनीतून ५०० क्युसेकने डाव्या कालव्याला विसर्ग सोडला आहे.

याशिवाय डिंभे २००, घोड १५०, खडकवासला १००५ आणि वीर धरणातून १५०० क्युसेकने उजव्या कालव्याला पाणी सोडले आहे. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांना बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com