Rain Update : धरणांतील पाण्याच्या आवकेत वाढ

पुणे : जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून, मागील काही दिवसांत कमी झालेल्या आवकेत पुन्हा वाढ झाली आहे.
Pune Rain Update
Pune Rain Update Agrowon

पुणे : जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट (Dam Catchment Area) क्षेत्रात पावसाचा जोर (Rain Intensity) वाढला असून, मागील काही दिवसांत कमी झालेल्या आवकेत पुन्हा वाढ झाली आहे. मंगळवारी (ता.१३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ६.७७ टीएमसी एवढ्या पाण्याची नव्याने आवक (Water Inflow In Dam) झाली आहे. यामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव या धरणांतून पाण्याच्या विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही साहित्य, जनावरे असल्यास तत्काळ हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Pune Rain Update
Crop Damage : अठरा हजार अतिवृष्टिग्रस्तांना मिळणार ११ कोटींची मदत

पुणे जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून चांगलाच मुसळधार पाऊस पडत आहे. पूर्व भागात जोरदार पाऊस पडत असला तरी पश्चिम भागात कमी-अधिक पाऊस पडत आहे. मुठा खोऱ्यातील टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ४० मिलिमीटर पाऊस पडला. तर, वरसगाव २०, पानशेत १८, खडकवासला एक मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे धरणांत ०.२४ टीएमसी एवढी पाण्याची आवक झाली आहे. नीरा खोऱ्यातील पवना धरणात ११ मिलिमीटर, तर चासकमान, भाटघर, नीरा देवघर आणि वडिवळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात १० मिलिमीटर पाऊस पडला. कासारसाई, कळमोडी, भामा आसखेड, आंध्रा, नाझरे, गुंजवणी या धरणक्षेत्रांतही पावसाच्या हलक्या सरी पडल्या. या पावसामुळे धरणांत नव्याने ०.७४ टीएमसी एवढा पाण्याची आवक झाली आहे.

कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे धरणक्षेत्रातही १६ मिलिमीटर पाऊस पडला. तर, माणिकडोह, चिल्हेवाडी धरणक्षेत्रांत १० मिलिमीटर पाऊस पडला असून येडगाव, वडज, डिंभे, घोड धरणक्षेत्रात तुरळक सरी पडल्या. विसापूर धरणक्षेत्रात १८ मिलिमीटर, उजनी २, मुळशी ५१ मिलिमीटर पाऊस पडल्याने धरणांत बऱ्यापैकी पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश सर्वच धरणे भरली असल्याने धरणांतून विसर्ग सोडण्यात येत आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव या धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. पानशेतमधून सांडव्याद्वारे ९७७ व विद्युत निर्मिती केंद्राद्वारे ५५० क्युसेक असा एकूण १,५२७ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला होता. खडकवासल्यातून सकाळी ११ वाजता ३,४२४ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला.

वरसगाव, पानशेत, पवना, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, नाझरे, गुंजवणी, नीरा देवघर, वीर, पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड, विसापूर, उजनी या धरणांतूनही पाण्याचा विसर्ग कमी-अधिक करण्यात येत आहे. त्यामुळे कुकडी, घोड, भीमा, नीरा, मुठा, पवना, इंद्रायणी, कानंदी, कऱ्हा या नद्यां दुथडी भरून वाहत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com