घाटमाथ्यावर मुसळधार; विदर्भातही दमदार

मुंबईसह कोकणाच्या इतर जिल्ह्यात पाऊस कमी झाला. घाटमाथ्यावर मात्र पावसाची कोसळधार सुरूच असल्याचे चित्र आहे. सातारा, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाने दणका दिला आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

पुणे : मॉन्सून सक्रिय असल्याने घाटमाथ्यावर पावसाची मुसळधार सुरूच आहे. धरणांच्या पाणलोटात (Catchment Area) सुरू असलेल्या पावसाने पाणीसाठ्यात (water storage) वाढ झाल्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सातारा, रायगड, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहिला. तर विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असली तरी पावसाच्या सरी अधूनमधून पडत आहेत. जोर ओसरल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीतदेखील घट झाली आहे. मुंबईसह कोकणाच्या इतर जिल्ह्यात पाऊस कमी झाला. घाटमाथ्यावर मात्र पावसाची कोसळधार सुरूच असल्याचे चित्र आहे. सातारा, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाने दणका दिला आहे. यात दावडी, शिरगाव, ताम्हिणी येथे २५० मिलीमीटर तर कोयना नवजा २३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील पातोंडा (ता.अमळनेर) व परिसरात मागील दोन दिवसांपासून पातोंडा व परिसरात पावसाने जोर धरला. अतिवृष्टी झाल्याने कापूस, मका, मूग, उडीद पिके पाण्यात आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात पावसाचा जोर असल्याने चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तर जिल्ह्याच्या इतर भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे.

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस पडला. पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे भात पिकांना चांगलाच आधार मिळाला. अनेक ठिकाणी भात लागवडी उरकल्या आहेत. पूर्व भागात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती.

पिकांचे वाढते नुकसान

पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. गोंदिया, भंडारा जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. गोंदियातील तिरोडा येथे २२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. सततच्या पावसाने शेतीची कामे ठप्प पडली. पिकांचे नुकसान वाढत चालले आहे. मूग, उडीद, सोयाबीन पिकांमध्ये फुलोरावस्था सुरू झाली आहे. या काळात सूर्यप्रकाशाचीही पिकांना गरज भासू लागली आहे.

राज्यात बुधवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :माथेरान ९०, जव्हार ८०, चिपळूण, विक्रमगड प्रत्येकी ७०, पालघर, शहापूर प्रत्येकी ६०, उल्हासनगर, कल्याण प्रत्येकी ५०, मुरबाड, रोहा, वाडा, पोलादपूर, अंबरनाथ प्रत्येकी ४०.

मध्य महाराष्ट्र :इगतपुरी ९०, सुरगाणा, येवला प्रत्येकी ६०, त्र्यंबकेश्वर ५०, महाबळेश्वर ४०, राधानगरी, पेठ ३०

मराठवाडा :भेकरदन ४०, सिल्लोड, जाफराबाद, बिलोली, हादगाव प्रत्येकी ३०.

विदर्भ : तिरोडा २२०, तुमसर, सडकअर्जूनी प्रत्येकी १९०, गोरेगाव, ब्रह्मपूरी प्रत्येकी १८०, कोर्ची १७०, देवरी १३०, नागभिड, हिंगणा, गोंदिया, रामटेक प्रत्येकी ११, वाशिम, सालकेसा प्रत्येकी १००, देसाईगंज, चिमूर, समुद्रपूर, आमगाव, भंडारा, नागपूर, कामठी प्रत्येकी ९०, मौदा, आरमोरी, देवळी, गोंदिया, नरखेडा, पारशिवणी, खारंघा काटोल प्रत्येकी ८०.

घाटमाथा : दावडी, शिरगाव, ताम्हिणी २५०, कोयना नवजा २३०, लोणावळा १९०, डुंगुरवाडी १६०, आंबोणे १५०, खोपोली, वळवण प्रत्येकी १४०, कोयना पोफळी १३०, भिवापूरी, खंद प्रत्येकी ११०, भिरा १००.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com