
Sangali News सांगली ः केंद्र सरकारच्या अटल भूजल योजनेअंतर्गत (Atal Bhujal Scheme) जिल्ह्यातील ९५ गावांमध्ये पिझोमीटर आणि पर्जन्यमापक बसविण्यात येणार आहेत. या गावांत पाण्याचा किती उपसा झाला आहे, भूजल पातळी (Ground Water Level) किती आहे, हे ग्रामस्थांना कळणार आहे, अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी दिली.
केंद्र सरकार जागतिक बँकेच्या मदतीने अटल भूजल योजना २०२५ पर्यंत राबविणार आहे. या योजनेत जिल्ह्यातील ९५ गावांचा समावेश आहे. दर तीन महिन्यांनी भूजल संरक्षण विभागाला भूजल पातळी मोजावी लागते.
त्यासाठी काही विहिरींची निवड करून संबंधित अधिकारी व कर्मचारी भूजल पातळी मोजतात. यासाठी जास्त कालावधी लागतो.
शिवाय, तीन महिन्यांनी भूजल पातळी समजते. यावर उपाय म्हणून अटल भूजल योजनेतून पिझोमीटर यंत्राद्वारे दररोज त्या गावांतील भूगर्भात किती पाणी आहे आणि त्याचा किती उपसा झाला, याची माहिती मिळणार आहे.
हे पिझोमीटर म्हणजे एक विंधन विहीर असून त्यावर स्वयंचलित मशिन बसवून पाण्याची पातळी मोजण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतीअंतर्गत पिझोमीटरची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी ९४ विंधन विहिरींचे खोदकाम पूर्ण झाले असून, विंधन विहिरीभोवती जाळी लावण्याचे काम सुरू आहे.
कवठे महांकाळ तालुक्यातील आगळगाव, अलकुड (एस.), अलकुड (एम.), आरेवाडी, बनेवाडी, बसप्पाचीवाडी, बोरगाव, देशिंग, ढालेवाडी, अग्रणधुळगाव, गर्जेवाडी, हरोली, हिंगणगाव, इरळी, जाधववाडी, जाखापूर, जायगव्हाण, करलहट्टी, केरेवाडी, खरशिंग, कोगनोळी, कोकळे, कुची, कुकटोळी, कुंडलापूर, नरसिंहगाव, लंगरपेठ, लोणारवाडी, मळणगाव, म्हैसाळ (एम), मोघमवाडी, मोरगाव, नांगोळे, पिंपळवाडी, रांजणी, रामपूरवाडी, सराटी, शेळकेवाडी, शिरढोण,
शिंदेवाडी (एच.), थबडेवाडी, विठूरायाचीवाडी, झुरेवाडी, करोली (टी.), खानापूर तालुक्यातील बलवडी खा., धोंडेवाडी, गोरेवाडी, हिवरे, करंजे, मोही, रामनगर, पळशी, पोसेवाडी, शेडगेवाडी, सुलतानगादे, बेणापूर, खानापूर नगरपंचायत, तासगाव तालुक्यातील अंजनी, बिरणवाडी, दहिवडी, डोंगरसोनी, गव्हाण, जरंडी, लोकरेवाडी, नागेवाडी, सावळज, सिद्धेवाडी, वज्रचौंडे, वडगाव,
वायफळे, यमगरवाडी, जत तालुक्यातील अंकले, बाज, बसर्गी, बेळुंखी, बिळूर, डफळापूर, डोर्ली, एकुंडी, गुगवाड, जिरग्याळ, खलाटी, खिलारवाडी, खोजानवाडी, कुडणूर, साळमाळगेवाडी, सिंदूर, शिंगणापूर, वज्रवाड, उमराणी, मिरवाड, येळदरी, मिरज तालुक्यातील चाबुकस्वारवाडी, सलगरे या गावांमध्ये पिझोमीटर बसविले जाणार आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.