Rain Update : अकोला जिल्ह्यातील प्रकल्प तुडुंब

यंदा सातत्याने झालेल्या जोरदार पावसामुळे अकोला सिंचन मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये साठवण क्षमतेच्या तब्बल ९३.३२ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.
Irrigation
Irrigation Agrowon

अकोला ः यंदा सातत्याने झालेल्या जोरदार पावसामुळे अकोला सिंचन मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये साठवण क्षमतेच्या तब्बल ९३.३२ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. परतीच्या पावसाने हे प्रकल्प १०० टक्के भरणार असल्याची खात्री निर्माण झाली असून, यंदा रब्बीत सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

Irrigation
Irrigation techniques: सिंचनासाठी क्षारयुक्त पाणी वापरताना काय काळजी घ्याल?

अकोला सिंचन मंडळाच्या अखत्यारित काटेपूर्णा, वाण हे दोन मोठे प्रकल्प आहेत. शिवाय मोर्णा, निर्गुणा, उमा हे तीन मध्यम, तर २४ लघू प्रकल्प येतात. या प्रकल्पांमध्ये ३२३ दलघमी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. ९३.३२ टक्के जलसाठा आहे. या वर्षी शेतकऱ्यांना सिंचनाकरिता मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांमधील पाण्याचा प्रश्‍न निकाली निघणार आहे. जिल्ह्यात मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पातून सिंचनासोबत पुरवठा योजना, मत्स्यबीज उत्पादनालाही पाणी दिले जाते.

Irrigation
Irrigation techniques: सिंचनासाठी क्षारयुक्त पाणी वापरताना काय काळजी घ्याल?

काटेपूर्णा प्रकल्पाची साठवण क्षमता ८६.३५ दलघमी आहे. यात सध्या ९७.१४ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पातून ५ हजार हेक्टरपेक्षा अधिक जमीन सिंचनाखाली येते. तर वान प्रकल्पाची साठवण क्षमता ८१.९५ दलघमी असून सध्या त्यात ७७.०३ दलघमी साठा आहे. या प्रकल्पातूनही चार हजार हेक्टरपेक्षा अधिक जमीन सिंचनाखाली येते.

सिंचन क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता

यंदा प्रकल्प तुडुंब भरलेले असल्याने सिंचन क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील रब्बी हंगामात काटेपूर्णा, वाण, मोर्णा, निर्गुणा, उमा आणि लघू प्रकल्पाच्या माध्यमातून ९ हजार २५२ हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले होते. यासाठी १९६.४४ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले होते. या वर्षी जवळपास सर्वच प्रकल्प १०० टक्के भरणार असल्याने सिंचन क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com